बातम्या

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीच मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंना काळं फासलं

अतुल पाटील

मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांच्या एजन्सीला आरक्षणाच्या सर्व्हेचं काम दिलं म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सराटे यांना काळं फासलं. सराटे हे मराठा आरक्षणाचे समर्थक असतानाही त्यांना काळं फासण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. औरंगाबाद इथल्या सुभेदारी विश्रामगृह इथं राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आरक्षणासंदर्भात निवेदन स्वीकारण्यासाठी आले होते. त्यावेळी ही घटना घडली. मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी बाळासाहेब सराटे यांच्या तोंडावर शाई फेकून काळं फासलं. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

दुसरीकडे सराटे हे आरक्षणाबाबत मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. ते संघाचे हस्तक असल्याची टीका मराठा क्रांती मोर्चाच्या एका गटानं केली. सराटे हे मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत. त्यांची 'शिवाजी' नावाची संस्था असून या संस्थेला मराठा आरक्षणाच्या सर्व्हेचं काम देण्यात आलंय आणि त्यावरुनच मराठा क्रांती मोर्चातील एका गटाचा विरोध होतोय. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्रीपद आणि घराणेशाही वरून व्यक्त केली खदखद

White Clothes Cleaning Tips: पांढऱ्या कपड्यांवर लागला दुसऱ्या कपड्याचा रंग? 'ही' घरगुती ट्रिक वापरून सहज करा स्वच्छ

विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रार दाखल; धक्कादायक कारण आलं समोर

Diet Tips : Workout करण्याआधी हे पदार्थ खा मिळेल भरपूर एनर्जी

Accident News: भरधाव कारने मुलाला चिरडलं; 9 वर्षाच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू, मुंबईतील थरारक घटना

SCROLL FOR NEXT