maid geeta kale print visiting card and it viral
maid geeta kale print visiting card and it viral  
बातम्या

VIDEO | मोलकरीणबाईंना ‘व्हिजिटिंग कार्ड’ छापण्याची कल्पना आली तरी कुठून?

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे - महिन्याकाठचं चार हजार रुपयांचं काम गेल्यानं मावशींच्या अर्थात, गीता काळेंच्या चेहऱ्यावर चिंता होती. त्या रोज नव्या कामाच्या शोधात असायच्या; पण मावशींना काम मिळालं नाही. त्यांना काम देण्याच्या उद्देशानं त्यांची घरमालकीण धनश्री शिंदे यांनी गीता यांचं ‘व्हिजिटिंग कार्ड’ छापलं. ते मैत्रिणींना व्हॉटसॲपवर पाठवलं. तेव्हाचं ‘घर काम मावशी’चं हे ‘कार्ड’ सोशल मीडियावर व्हायरल झालं अन्‌ गीता सोशल जगतात ‘फेमस’ झाल्या. गीता यांच्या कार्डवर चर्चा तर रंगलीच; पण दिवसात अडीच हजार फोन, एक हजार मेसेजद्वारे त्यांना कामाच्या ‘ऑफर’ आल्या.

विशेष म्हणजे, ‘सोशल मीडिया’वरचं व्हिजिटिंग कार्ड पाहून जुन्या मालकाने गीता यांना पुन्हा काम दिलं. बुधवारपासूनच त्यांनी जुन्या ठिकाणी काम करायला सुरवात केली. 

सध्या ‘सोशल मीडिया’वर राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच बुधवारी दिवसभर गीता यांच्या नावाचं कार्ड धुमाकूळ घालत होतं. या कार्डवर आधारकार्डसह मोलकरणींच्या पारंपरिक म्हणजे, धुणी-भांडी, झाडू-पोछा, कपडे धुणे, भाकरी करण्याच्या कामाची यादी होती. एवढेच नव्हे, तर कामाचे स्वरूप सांगतानाच त्यासाठीच्या महिन्याकाठच्या पगाराचाही कार्डवर उल्लेख होता. तर मागणीप्रमाणे भाज्या निवडणे, कापणे आणि घराच्या सफाईचीही कामे केली जातील, हेही गीता यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे मावशींचा मोबाईल बुधवारी दिवसभर खणखणत राहिला. कार्डची चर्चा, प्रतिसादनं गीता प्रचंड वैतागल्या आणि त्यांनी आपला फोन बंद केला. त्यावरून व्हायरल ‘सत्य की असत्य’याचीही चर्चा रंगली. 

कार्ड छापण्याचा उद्देश साध्य झाला असून, गीता यांना चांगल्या पगाराचं काम पुन्हा मिळालं आहे. मात्र, एवढ्या प्रमाणात चर्चा होईल, याची कल्पना नव्हती, असे मावशीची घरमालकीण धनश्री शिंदे यांनी सांगितले.

नवे काम हवे असल्याने धनश्रीताईंनी कार्ड तयार केलं आहे. ते अजूनही घरातच आहेत, तरीही खूप फोन येत आहेत. त्याआधीच मला जुनी कामेही मिळाली. आता कोणतेही नवे काम नको. एवढ्या कामावर मुलांचे शिक्षण करेल.
- गीता काळे, मावशी

Web Title - maid geeta kale print visiting card and it viral on social media

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: ओमराजेंचा तानाजी सावंतांवर रुग्णवाहिका घाेटाळ्याचा आराेप, महायुतीकडून ओमराजेंना 'हे' सवाल, Video

Soyabean Benefits: सोयाबीन खा अन् धडधाकट राहा, आरोग्यदायी फायदे

IPL 2024: शिवम दुबेची अफलातून फलंदाजी; या बाबतीत दिग्गजांनाही सोडलं मागे

Hot Water Benefits: जेवण केल्यानंतर गरम पाणी पिण्याचे फायदे काय?

Mumbai Crime: कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; पत्नीने बनवला व्हिडिओ अन्.. मुंबईतील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT