बातम्या

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू; दुधाच्या विक्रीचा प्रश्न राज्यात ऐरणीवर

सकाळ न्यूज नेटवर्क

राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू केल्याने दुधाच्या विक्रीचा प्रश्न राज्यात ऐरणीवर आला आहे. दूधविक्रीसाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास बाटलीत दूध द्यावे लागेल. आणि त्यासाठी ग्राहकांना प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागेल.

प्लास्टिक बंदीबाबत योग्य निर्णय न घेतल्यास राज्यात दूध उत्पादक आंदोलन करतील, असाही इशारा त्यांनी दिला. राज्यातील दूध उत्पादकांचे 30 ऑक्टोबरपासून सुमारे सव्वादोनशे कोटी रुपयांचे बील सरकारकडे थकले आहे. सरकार जेव्हा पाच रुपये अनुदान देईल त्यानंतर आम्ही उर्वरित पाच रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना रक्कम देऊ असा निर्णयही दूधउत्पादक संघाच्या बैठकीत घेण्यात आला.

यामुळे राज्यातील खासगी दूध उत्पादक विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, या संघर्षात ग्राहक होरपळून निघतील, अशीही भीती व्यक्त होत आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Crime News : 2 वर्षांपासून पोलिसांना देत होता चकवा; अखेर गुंड हितेंद्र ठाकूरला गुजरातमध्ये अटक

Maharashtra Rain Update: विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; घरांवरील पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली, पाहा VIDEO

Pat Cummins Statement: बॅक टू बॅक पराभवानंतर पॅट कमिन्स भडकला! पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

Today's Marathi News Live : हेमंत सोरेन यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर आज सुनावणी

Elon Musk: भारत भेट रद्द केल्यानंतर मस्क पोहोचले चीनमध्ये, भेटीचं कारण काय?

SCROLL FOR NEXT