बातम्या

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तो आला ऑस्ट्रेलियामधून

सकाळ न्यूज नेटवर्क

पाली : रायगड लोकसभा मतदार संघाची निवडणूक मंगळवारी (ता. २३) संपन्न झाल्या. यावेळी संविधानाने दिलेल्या मताधिकाराचा हक्का बजावण्यासाठी रोहा तालुक्यातील कोलाड येथील पंकज अशोक सोनटक्के हा तरुण खास ऑस्ट्रेलियामधून आला होता. मतदानाचा टक्का वाढावा, योग्य उमेदवाराला मतदान करुन संविधानीक हक्क बजावावा या उद्देशाने पंकज मतदानासाठी इतक्या दुरुन आला होता.

मॅकॅनिकल इंजिनियर (बीटेक) असलेले पंकज मागील दोन वर्षांपासून कामानिमित्त ऑस्ट्रेलियात आहेत. तेथील साईनक्राफ्ट या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर काम करतो. ते रोहा तालुक्यातील कोलाडचे मुळ रहिवासी आहेत. येथे त्यांचे आईवडील मोठा भाऊ आणि वहिणी राहतात. निवडणूका म्हणजेच मतदान पाच वर्षातून एकदा येते. या वेळी मतदानाची तारीख जाहिर झाल्यावर निवडणूकिला यायचे ठरविले आणि त्यानुसार विमानाचे टिकीट काढुन नियोजन केले होते असे पंकज यांनी सकाळला सांगितले.

प्रत्यक्ष मतदान करण्यात वेगळी मजा आहे. मतदानाचा प्रत्येकाने हक्क बजावला पाहीजे. जे काही आपले प्रश्न व मागण्या असतील ते या एका दिवशी मतदान न करता योग्य व्यक्ती निवडून दिला नाही तर ते प्रश्न व मागण्या मार्गी लागू शकत नाहीत. या दिवशी आपले अधिकार आणि कर्तव्याशी प्रमाणिक राहुन जबाबदारीने मतदान करुन योग्य व्यक्ती निवडून दिला तर आपल्याला पुढचे पाच वर्षे कुठलाच त्रास होणार नाही व आपले प्रश्न, गरजा व मागण्या निश्चित सुटू शकतात इतक्या दुरवरून येण्याची हिच माझी भुमिका होती असे पंकज म्हणाला. अशा प्रकारे आपला हक्क व जबाबदारी बजावून पंकजने देशभक्तीच दाखवून दिली आहे.

निवडणूकीचा टक्का वाढला पाहिजे. आपला संविधानिक हक्क बजावून आपले प्रश्न मांडणारा व आपल्या मागण्या पुर्ण करणारा योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे. आपल्या अधिकार व कर्तव्यांबाबत सगळ्यांनी जागृत रहावे. प्रत्येकाने मतदानासाठी पुढाकार घेतला पाहीजे. त्यासाठी माझ्या परिने जनजागृती करत आहे.
- पंकज अशोक सोनटक्के, ऑस्ट्रेलिया

Web Title: marathi news loksabha 2019 persone comes from Australia for voting  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits of Ghee: जेवणामध्ये एक चमचा तूप; शरीराला आरोग्याचे वरदान

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Raut | कशाचा शोध घेतायत संजय राऊत?

Avinash Jadhav: खंडणीच्या आरोपानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT