बातम्या

पुणे-बंगळूर महामार्ग तातडीच्या वस्तूंसाठी सुरु.

सकाळ न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापुरामुळे गेल्या आठ दिवसांपासून पुराच्या पाण्याने वेढलेल्या पुणे-बंगळूर महामार्गावरील सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यानचा महामार्ग आज (सोमवारी) सकाळी तातडीच्या वस्तू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, सिलिंडर, औषधे तसेच भाजीपाल्यासाठी वाहतूक सुरू करण्यात आले आहे.

महामार्गावरील पाण्याची पातळी झपाट्याने ओसरू लागली आहे. आज सकाळी आठ वाजता पाण्याची पातळी दोन फुटावर होती. पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, आमदार अमोल महाडिक, शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण भोसले आदींनी महामार्गावर रस्त्याची सकाळी पाहणी केली. त्यानंतर इमर्जन्सी सेवेसाठी वाहतूक सुरू करण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून महामार्ग वाहतुकीला बंद करण्यात आल्याने हजारो वाहने रस्त्याच्या दुतर्फा अडकून आहेत. पाण्याची पातळी दुपारपर्यंत आणखी ओसरेल. त्यानंतर रस्त्यात अडकलेल्या वाहनांबाबत निर्णय होईल, असेही पोलिस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील चारचाकी वाहने वगळता अवजड वाहतूक सोमवारी दिवशीही ठप्पच होती. महामार्गावरील पूर्ण पाणी ओसरल्याशिवाय सर्व वाहनांची वाहतूक पूर्णपणे सुरू होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. संततधार पाऊस व धरणांतील पाणी विसर्गामुळे ठिकठिकाणी उद्‌भवलेल्या पूरस्थितीमुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतूक मंगळवारपासून ठप्प झाली आहे. 

Web Title: Pune Banglore highway start for emergency services
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT