तुम्ही आम्ही फ्लॅट खरेदी करतो. बिल्डरसोबत खरेदीचे व्यवहार झाल्यानंतर त्याची रितसर कागदपत्रंही घेतो. फ्लँट रजिस्ट्रेशननं, सोसायटी, शेअर सर्टिफिकेट अशा प्रक्रियेतही आपलं नाव असतं. पण हे सगळं झालं म्हणजे तुमचा फ्लॅट तुमच्या मालकीचा झाला असं नाही. कारण या सर्व प्रक्रियेत कन्व्हेन्स डीड होणंही तितकच आवशल्यक आहे. कारण नुसती फ्लॅटची मालकी पुरेशी नाही. तर ज्या जागेवर इमारत उभी आहे त्या जागेचा मालकी हक्कही फ्लॅटधारकाकडे असायला हवा...मुंबईत असाच एक प्रकार घडलाय. गोरेगावमधील एक इमारत तीन वर्षांपूर्वी कोसळली. त्यानंतर बिल्डरने बिल्डिंग पुन्हा बांधून द्यावी यासाठी रहिवाशांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. मात्र त्यावेळी कन्व्हेन्स डीडचा विषय आला आणि तिथेच फ्लॅटधारकांचा दावा कोसळला.
कसं कराल कन्व्हेन्स डीड?
त्यामुळे तुम्ही फ्लॅटधारक असाल तर कन्व्हेन्स डीडबाबत टाळाटाळ करून नका. अन्यथा तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरावर पाणी सोडावं लागेल.
WebTitle : marathi news know everything about conveyance deed
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.