बातम्या

कर्नाटक विधानसभा निवडणूक - त्रिशंकू विधानसभेकडे वाटचाल?

सकाळ न्यूज नेटवर्क

बंगळूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ मतदार संघांसाठीची आज (ता. १५) सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरवात झाली असून, सुरवातीच्या मनमोजणीनुसार काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभेचे चित्र त्रिशंकूकडे जात असल्याचे पहायला मिळत आहे.
सुरवातीच्या आघाडीनुसार काँग्रेसने बाजी मारल्याची चित्र होते. मात्र, भाजपने अंतर कमी करत काँग्रेसची बरोबरी केली. जेडीएस तिसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस 58, भाजप 54 आणि जेडीएस आणि इतर 25 जागांवर आघाडीवर आहे.
कर्नाटकमध्ये 12 मे रोजी 70 टक्के मतदान झाल्यानंतर काँग्रेस, भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यात चुरशीची लढतआहे. बहुमतासाठी 112 जागा मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सत्तेवर पुन्हा दावा केला असून भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार येडियुरप्पा यांनीही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. तर धर्मनिरपेक्ष जनता दल हा पक्ष राज्यात सत्तास्थापनेत ‘किंगमेकर’ची भूमिका बजावेल, असे संकेत मतपूर्व चाचण्यांत देण्यात आले आहेत. 
सायंकाळी उशिरा सर्व निकाल लागण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने जर आपले बहुमत खेचून आणले अथवा सत्ता स्थापन केल्यास १९८५ पासून पहिल्यांदाच एकाच पक्षास कर्नाटकात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापनेस संधी मिळणार आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेडगे यांनी दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीनंतर मागसवर्गीय नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांना पुन्हा संधी दिली जाण्याच्या तर्क-वितर्कांनाही जोर सध्या आला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Champions Trophy: 'टीम इंडियाला पाकिस्तानात यावंच लागेल, अन्यथा...' माजी पाकिस्तानी खेळाडूची वॉर्निंग

Kalyan Crime News: तहान लागल्याने पाणी प्यायला गेली, नराधमानं संधी साधली; कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

India's Smallest Village: भारतातील सर्वात लहान गाव तुम्हाला माहिती आहे का?

Jayant Patil News : भाजपचे इंजिन बंद पडल्यामुळे मनसेचे इंजिन सोबत घेतले; जयंत पाटील यांची खोचक टीका

Today's Marathi News Live : उत्तर मुंबई पियुष गोयल यांची भव्य रॅली; महायुतीचे हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी

SCROLL FOR NEXT