बातम्या

मोदींनी द्वेषाचा प्रयोग केला, तर आम्ही प्रेमाचा उपयोग करून निवडणूक लढली- प्रियांका गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारविरोधात देशातील जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात संताप आणि आक्रोश आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल हे निश्चित असून, मतांच्या माध्यमातून जनता त्यांचा संताप व्यक्त करेल, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज (रविवार) सांगितले. 

दिल्लीतील लोढी इस्टेट येथील सरदार पटेल विद्यालयात प्रियांका गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, 2019 ची लोकसभा निवडणूक लोकशाही आणि देशाला वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे मतदान करताना ही बाब लक्षात ठेवली पाहिजे. या निवडणुकीमध्ये देशातील जनतेमध्ये सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आक्रोश दिसत होता. त्यामुळे भाजपचा पराभव होणार हे आता स्पष्ट झाले आहे. 

जनतेच्या निर्णयावर पुढील निर्णय : राहुल गांधी

सर्व माध्यमांचे आभार मानतो. बेरोजगार, शेतकरी, नोटाबंदी, जीएसटीने अर्थव्यवस्थेचे नुकसान, भ्रष्टाचार या मुद्द्यांवर निवडणूक झाली. या निवडणुकीत मोदींनी द्वेषाचा प्रयोग केला, तर आम्ही प्रेमाचा उपयोग करून निवडणूक लढली. जनता जो निर्णय घेईल, त्यावरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.

Web Title: It is clear BJP is losing people will express their anger via votes says Priyanka Gandhi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : गोंदियामध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

Sharad Pawar on Narendra Modi: मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं; 'त्या' टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

Water Crisis Hits Maharashtra: पाणीसाठ्यात घट, नंदुरबारमध्ये 195 गावांना टंचाईच्या झळा; मालेगाव, हरसुलमध्ये भीषण स्थिती

IRCTC Hotel Service : स्टेशनवर 100 रुपयांत मिळणार हॉटेलसारखी रूम; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Amaravati Express Fire : दादर रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेसला आग, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT