भारताकडून आणखी एका न्यूक्लियर मिसाईलचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. डिफेंस रिसर्च एंड डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन (DRDO) नोव्हेंबरला आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम किनार्यावरून ही चाचणी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाण्याखालील एका प्लॅटफॉर्मवरून हे लॉन्चिंग केलं जाणार आहे.
ANI या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार ज्या न्यूक्लियर मिसाईलची भारत चाचणी करणार आहे त्याचं नाव K4 असं असल्याचं समजतंय. हे न्यूक्लियर मिसाईल 3500 किमी पर्यंत अचूक निशाणा साधू शकतं. हे देशातील दुसरं अंडरवॉटर मिसाईल आहे.
या आधी B0-5 या न्यूक्लियर मिसाईलची चाचणी भारताने केली होती. ही चाचणी सफल ठरली होती. B0-5 या न्यूक्लियर मिसाईलची मारक क्षमता 700 किमीपेक्षा जास्त होती. दरम्यान, K 4 च्या टेस्टिंगनंतर हेच भारताच्या भात्यातील सर्वात शक्तिशाली अंडर वॉटर मिसाईल असेल यात शंका नाही.
डिफेंस रिसर्च एंड डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन (डीआरडीओ) ने या आधी B0-5 या 700 किमी मारक-क्षमता असलेल्या मिसाईलची चाचणी केली होती. DRDO सूत्रांच्या माहितीनुसार K 4 ची चाचणी मागच्या महिन्यातच केली जाणार होती. मात्र, काही कारणांमुळे ते पुढे ढकलण्यात आलं.
अमेरिका, ब्रिटन, फ्रांस, रशिया आणि चीन नंतर भारत अशा मिसाईलची चाचणी करणारा भारत हा सहावा देश ठरणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार INS अरिहंत वरून हे न्यूक्लियर मिसाईल डागण्यात येणार आहे. दरम्यान, असंही सांगितलं जातंय की येत्या काही आठवड्यांमध्ये अग्नि-3 आणि ब्रह्मोस मिसाईलची देखील चाचणी करण्यात येणार आहे.
WebTitle : india will test most powerful nuclear missile in bengaluru
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.