बातम्या

टीम इंडियासाठी केएल राहुल आला धावून; दमदार सेंच्युरी

सकाळ न्यूज नेटवर्क

INDvsNZ: भारताचा सध्याच्या भरवशाचा फलंदाज लोकेश राहुलने एकदिवसीय क्रिकेमधील चौथं शतक साजरं केलंय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा डाव गडगडला असताना राहुल पुन्हा मदतीला धावून आला. त्यानं श्रेयस अय्यर आणि मनिष पांडेच्या मदतीनं भारताचा डाव सावरला आणि भारताला समाधानकार धावसंख्येच्या दिशेनं नेलं. पण, राहुलची विकेट पडल्यानंतर भारताला फारशी मजल मारता आली नाही. भारत 300 धावांपर्यंत पोहचेल, असं वाटत असताना 50 ओव्हर्समध्ये भारताचा डाव, 296 रन्सवर आटोपला.

टॉप ऑडर पुन्हा अपयशी
सलग दिसऱ्या मॅचमध्ये भारताची टॉप ऑडर गडगडली. मयांक अगरवाल केवळ एका रनवर आऊट झाला. तर, पृथ्वी शॉने थोडी फार चमक दाखवली. त्यानं 3 चौकार आणि 2 सिक्सरच्या साह्यानं 40 रन्स केल्या. पण, त्याला मोठी खेळी उभारण्यात अपयश आलं. तो रन आऊट झाला. कॅप्टन विराट कोहली या सिरीजमध्ये सलग तिसऱ्यांदा अपयशी ठरला. त्यानं केवळ नऊ रन्स केल्या. वरची फळी लवकर बाद झाल्यावर प्रचंड दबावाखाली फलंदाजी करत ९ चौकार आणि १ षटकार खेचत शतक पूर्ण केलं. राहुल आज पाचव्या क्रमांकावर केवळ पाचवा सामना खेळत आहे. या पाच सामन्यामध्ये त्याने २ अर्धशतके आणि आज एक शतक झळकावले आहे. शतक झळकावल्यानंतर तो वेगानं रन्स करेल असं वाटत असताना, 112 रन्सवर तो आऊट झाला. अर्थात तोपर्यंत त्यानं त्याची जबाबदारी पूर्णपणे पार पाडली होती. पण, पाठोपाठ मनिष पांडेही आऊट झाला. 

#KLRahul scores a 100 in 3rd ODI cricket. #INDvsNZ #Sakal #SakalMedia #news #viral #SakalNews #ViralNewshttps://t.co/OmwhBCoSGE pic.twitter.com/oeZ2UNVJK6

— sakalmedia (@SakalMediaNews) February 11, 2020

ओपनिंगचा प्रयोग फसला
या सिरीजमध्ये विराट कोहलीनं पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या ओपनिंग जोडी खेळवली पण, तिन्ही मॅचमध्ये भारताला चांगली सुरुवात देण्यात दोघे अपय़शी ठरले. त्यात मयांक अगरवाल साफ अपयशी ठरला. पृथ्वीनं दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये थोडी फार चमक दाखवली. पण, त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात साफ अपयश आलं. याचा फटका टीमला बसला आणि चांगल्या सुरुवातीच्या अभावी टीमला मोठी मजल मारता आली नाही. तीन मॅचच्या या सिरीजमध्ये न्यूझीलंडनं 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळं किमान आजची शेवटची मॅच जिंकून लाज राखण्याचं आव्हान भारतापुढं आहे. 

Web Title India Vs New Zealand 3rd Odi 2020 K L Rahul Century

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

Maharashtra Tourism: सूर्य आग ओकतोय! उष्णतेच्या झळा थंड हवेच्या ठिकाणांनाही, पर्यटकांनी फिरवली पाठ

SCROLL FOR NEXT