बातम्या

बॉलिवू़डच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार आर.के.स्टुडिओची मालकी गोदरेज प्रॉपर्टीज कडे

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : आर. के. स्टुडिओने बॉलिवूड क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून ओळख मिळविली आहे. जवळपास 70 वर्ष जुना हा स्टुडिओ बॉलिवू़डच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार राहीला आहे. या स्टुडिओची मालकी आता नव्या मालकाकडे गेली आहे.

मुंबईतील चेंबूर येथे उभा असलेला आर. के. स्टुडिओची मालकी आतापर्यंत चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी कपूर कुटुंबाकडे होती. 'गोदरेज प्रॉपर्टीज'ने आर. के. स्टुडिओ विकत घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कपूर कुटुंबीय गोदरेज प्रॉपर्टीजशी चर्चा करत होते. '2.2 एकर क्षेत्रात पसरलेल्या आर. के. स्टुडिओच्या 33,000 वर्ग मीटर क्षेत्रात आधुनिक निवासी अपार्टमेंट बांधण्यात येणार आहेत,' अशी माहिती 'गोदरेज प्रॉपर्टीज' कंपनीने दिली. शुक्रवारी या कंपनीने आर. के. स्टुडिओ विकत घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे. याठिकाणी आता आलिशान फ्लॅट्स बांधले जाणार आहेत.

रणधीर कपूर यांनी सु्द्धा या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'माझ्या कुटुंबासाठी चेंबूरमधील ही जागा फार महत्त्वपूर्ण आहे. या जागेवर आता नवीन बांधकाम करण्यासाठी आम्ही गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीला निवडले आहे,' असे त्यांनी सांगितले.

स्टुडिओतून मिळणारे उत्पन्न हे फारच कमी असल्यामुळे त्याच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्यामुळे कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला होता. दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर, मुले रणधीर, ऋषी आणि राजीव आणि मुलगी रितू नंदा आणि रिमा जैन यांनी एकमताने स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला असून स्टुडिओची विक्री झाल्यानंतर त्यातून येणारा नफा स्टुडिओशी संबंधित प्रत्येकाला देण्यात येणार आहे.

Web Title:marathi news Godrej Properties buys Mumbai's iconic RK studio

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

Prasad Khandekar Birthday : 'पश्या खूप मोठा हो, यशाचे शिखरं गाठ...' नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Pune News: धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुंप्तांगावर मार लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील घटना

Today's Marathi News Live : नवी मुंबईत शिवसेना मनसेची नियोजन बैठक संपन्न

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डीहायड्रेशनपासून राहाल दूर

SCROLL FOR NEXT