बातम्या

पर्यटनासाठी गांधी कुटुंबीयांनी केला 'INS विराट'चा वापर : मोदींचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क

राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासुरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला. मोदी यांनी राजीव गांधी यांना लक्ष्य करत, जे लोक आज सांगत आहेत की, सेना कोणाची जहागीर नाही त्याच कुटुंबीयांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर खाजगी सुट्ट्यांसाठी केला होता असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या सुट्ट्यांचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली त्याबाबत एका हिंदी न्यूज चॅनेलने एक बातमी प्रसारीत केली आहे. ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर कुटुंब आणि मित्रांसोबत सुट्टी घालविण्यासाठी केला होता. त्यावेळीही राजीव गांधी यांच्यावर टीका झाली होती. 

दरम्यान, एका हिंदी वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, 1987 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी कुटुंब काही खास मित्रांसोबत लक्षद्वीप येथील बंगाराम बेटावर त्यांचे कुटुंब आणि मित्रपरिवार सुट्टी एन्जॉय करायला गेले होते. यावेळी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासोबत या पर्यटनात राहुल आणि प्रियंका गांधी यांचे मित्र, सोनिया गांधी यांची बहीण तसेच कुटुंब, सोनिया गांधी यांची आई, भाऊ आणि मामा सहभागी होते. तसेच राजीव गांधी यांचे मित्र अमिताभ बच्चन, त्यांच्या पत्नी जया बच्चन आणि तीन मुलंही सोबत होती. तीन मुलांमध्ये अमिताभ यांचे भाऊ अजिताभ यांच्या मुलीचाही समावेश होता. गांधी कुटुंबीयांचा हा दौरा प्रचंड गोपनीय ठेवण्यात आला होता. मात्र तरीही ही बातमी माध्यमांसमोर आली. त्यानंतर अनेक विवाद झाले. राजीव गांधी यांच्यावर विरोधकांनी प्रचंड टीका झाली होती.

Web Title: marathi news gandhi family used INS Viraat for personal tourism allegation by naremdra modi


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case: अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणी दोघांना अटक, आप-काँग्रेसशी कनेक्शन आलं समोर

Dhananjay Mahadik | धनंजय महाडिक यांची कुणावर टीका?

Aaditya Thackeray Vs Shrikant Shinde : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये का पाठवले? आदित्य ठाकरेंचा श्रीकांत शिंदेंच्या टीकेवर हल्लाबाेल, Video

KL Rahul Record: केएल राहुलला नंबर १ बनण्याची संधी! अवघ्या ३५ धावा करताच रचणार इतिहास

Buldana News | बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई

SCROLL FOR NEXT