बातम्या

शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव पाडले बंद, निर्यातबंदी उठवण्यासाठी तीव्र आंदोलन

साम टीव्ही न्यूज

संपूर्ण नाशकात कांद्यांचा प्रश्न पेटलाय. कांद्यावरील निर्यातबंदी तातडीनं हटवावी आणि कांद्याला हमीभावाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेत. लासलगाव, मनमाड, उमराणे या सर्वच ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडलेत. येत्या 2 दिवसांत कांद्यावरील निर्यातबंदी न हटल्यास गुरुवारी रेलरोको आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. महाराष्ट्र राज्य कांदा ऊत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनीं हे आंदोलन केलंय... कांद्याची निर्यातबंदीचे ट्विट करून सहा दिवस उलटून गेल्यानंतर ही अधिसूचना न निघाल्याने कांद्याच्या बाजार भावात घसरण झालीय. शनिवारच्या तुलनेत आज सोमवारी 332 रुपयांची तर गुरुवारच्या तुलनेत 650 रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी संतप्त झालेत.

नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या कांदा परिषदेत कांदा प्रश्नावर चर्चा झाली. यानंतर देशभरातील शेतकरी दिल्लीत धडकणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली. शेतीमालातील हस्तक्षेप बंद करून शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे मागणीसाठी शेतकरी दिल्लीला जाणारेत.

Web Title - marathi news Farmer's agitation for onion rates 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Godrej Family Split: १२७ वर्षे जुन्या गोदरेजमध्ये फूट; कंपनीची झाली दोन शकलं, कोण असणार उद्योगाचे नवे चेहरे?

Maharashtra Lok Sabha : महायुतीचा महाफॉर्म्युला फायनल! पक्ष, उमेदवार आणि प्रमुख लढतींचं चित्र स्पष्ट

ICC T20 World Cup 2024: मायकल वॉनची मोठी भविष्यवाणी! म्हणतो, टीम इंडिया नव्हे तर हे ४ संघ जाणार सेमीफायनलमध्ये

Today's Marathi News Live : चीनमध्ये महामार्ग खचून १९ जणांचा मृत्यू, २० वाहनं ढिगाऱ्याखाली अडकली

Stale Food Disadvantages : शिळं जेवण खाल्ल्याने तुम्हाला होतील 'हे' गंभीर आजार

SCROLL FOR NEXT