बातम्या

आम्हीही भरपूर सर्जिकल स्ट्राईक केले होते.. : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भाजपकडून लष्कराने पाकमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाईक, एअर स्ट्राईकचा निवडणुकीत वापर होत असताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आमच्या सरकारच्या काळात अनेकवेळी सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी आम्ही मतांसाठी त्याचा वापर केला नसल्याचेही म्हटले आहे.

मनमोहनसिंग यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केले आहे. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकार आर्थिक स्तरावर अपयशी ठरल्याची टीका केली आहे. ‘मोदी सरकार आर्थिक स्तरावरील अपयश लपवण्यासाठी लष्कराच्या शौर्याचा फायदा घेत असून हे लाजिरवाणं आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

मनमोहनसिंग म्हणाले, की 2008 मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारत देखील लष्कर कारवाई करु शकत होता. युपीए सरकार लष्करी कारवाई करण्यास तयार नव्हते या आरोपाशी मी सहमत नाही. प्रत्येक परिस्थितीत वेगवेगळ्या प्रतिक्रियांची अपेक्षा असते. आम्ही पाकिस्तानला पूर्ण वेगळं पाडण्याचा आणि त्यांचा चेहरा जगासमोर उघड कऱण्याचा निर्णय घेतला होता. तसेच दहशतवाद्यांविरोधात निर्णायक कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव आणण्याचाही भूमिका आम्ही घेतली होती. आम्हाला यामध्ये यशही मिळाले होते. मुंबई हल्ल्यानंतर 14 दिवसांच्या आत हाफिज सईदला जागतिक दहशतवादी घोषित कऱण्यात आले. युपीए सरकारने मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंडवर अमेरिकेकडून 10 लाख डॉलर्सचं बक्षीसही जाहीर करुन घेतलं. फरक फक्त इतकाच आहे की आम्ही यासंबंधी कधी जाहीर केलं नाही.

Web Title: marathi news Ex Pm Manmohan Singh on surgical strike during UPA government

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi in Solapur : स्वत: बाबासाहेब आंबेडकर आरक्षण संपवू शकत नाहीत, मग मोदींचा प्रश्नच नाही; पंतप्रधानांचा हल्लाबोल

Ravindra Dhangekar On PM Modi: पुणेकरांचा पैसा प्रचारासाठी वापरला, आचारसंहिता भंग केली; मोदींच्या सभेवर रविंद्र धंगेकरांचा आक्षेप

Omraje Nimbalkar Vs Tanaji Sawant: पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवाल का? तानाजी सावंतांच्या टीकेवर ओमराजेंचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान

Maharashtra Din 2024 : जय जय महाराष्ट्र माझा... १ मे ला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

Jalana News: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग! गावकरी, पोलीस घटनास्थळी दाखल; जालन्यात काय घडलं?

SCROLL FOR NEXT