बातम्या

कोयना परिसरात भूकंपाचा धक्का, कोयना-पाटण परिसर हादरला

सकाळ न्यूज नेटवर्क

कोयनानगर (जि. सातारा) : साताऱ्यातल्या कोयना परिसराला भूकंपाचा धक्का बसलाय. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्याने संपूर्ण कोयना-पाटणा परिसर हादरुन गेलाय. या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आलीय..तर या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कोयनानगर येथे पडलेली गुलाबी थंडी व कोयना वासीयांची साखरझोप आज (सोमवार) सकाळच्या सुमारास पहाटे कोयना परिसरात झालेल्या भूकंपाच्या सौम्य धक्‍क्‍याने उडाली आहे.

कोयना भागात नेहमीच भुकंपाचे धक्के बसत असतात. कधी ते छोट्या स्वरुपात असतात तर कधी मोठ्या प्रमाणात असतात. आज (सोमवार) सकाळी कोयना , पाटण , कोकण किनारपट्टीचा परिसरात भुकंपाचा सौम्य धक्का बसला आहे.
 

भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्‍क्‍याची तीव्रता 2.6 रिश्‍टर स्केल तर भूकंपाच्या धक्‍क्‍याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून आठ किलोमीटरवर होता. या भूकंपाच्या धक्‍क्‍याने कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाले नाही अशी माहिती प्रशासनाद्वारे कळविण्यात आली आहे. दरम्यान गुलाबी थंडीत व साखरझोपेत असणाऱ्यांची भुकंपाने मात्र झोप मात्र उडाली आहे.

Web Title: Earthquake In Koynanagar - Patan Near Satara

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Maharashtra News Live Updates: मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक मंदावली

Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

Devendra Fadnavis : 'बटेंगे तो कटेंगे' हा देशाचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांचं योगींच्या घोषणेला समर्थन

SCROLL FOR NEXT