बातम्या

पुलवामाचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करावेत हा माझा सल्ला - शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क

चाकण - ‘पुलवामातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात चाळीस जवान मृत्युमुखी पडले. त्यानंतर सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात ‘पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त करावेत.

त्यासाठी हवाई दल, नाविक दलाचा वापर करून घ्या,’ असा सल्ला मी दिला. त्यामुळे हल्ले झाले; पण पंतप्रधान व भाजप मात्र या हल्ल्याचे राजकारण करत आहे, हे चुकीचे आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

भोसे-चाकण (ता. खेड) येथे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘‘देशाचे पंतप्रधान, ‘देश माझ्या मुठीत आहे, छपन्न इंचांची छाती आहे,’ असे सांगतात, हे योग्य नाही. या छपन्न इंचांच्या छातीच्या गप्पा कशाला? हे सरकार घालवले पाहिजे. सध्या शेतकरी, जवान अडचणीत आहे; पण हे सरकार काही करत नाही. नोटाबंदीचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला, हे रिझर्व्ह बॅंकेने सांगितले होते.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात वाढल्या आहेत. देशातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आम्ही मिळवून दिली; पण या सरकारने कर्जमाफी मिळवून दिली नाही.’’  

या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते.

WebTitle : marathi news to destroy terror bases in pakistan was my idea says sharad pawar 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni: अप्सरा हो तुम या कोई परी...

Today's Marathi News Live : राज्यात पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ४ दिवस शिल्लक

T-20 WC 2024: मोठी बातमी! टी-२० वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा; या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

Pune Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात शिंदवणेत दाेघांना अटक, 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

High Blood Sugar : घाबरु नका! शरीरात सतत रक्तातील साखर वाढतेय? हे ४ उपाय लगेच करा

SCROLL FOR NEXT