बातम्या

"अल्लाह के रास्ते से भटक गई थी" म्हणत 'दंगल'फेम अभिनेत्रीचा चित्रपटसृष्टीला रामराम

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘दंगल’ या चित्रपटात गीता फोगटच्या बालपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री झायरा वसीम हिने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आहे. 18 वर्षांच्या झायराने इतक्या लहानशा वयात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पण करिअरच्या ऐन सुरुवातीला झायराने बॉलिवूडमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेऊन चाहत्यांना जोरदार धक्का दिला आहे.

मी अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला असल्याचे झायराने सांगितले. झायराने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपला निर्णय चाहत्यांशी शेअर केला आहे. अल्लाह के रास्ते से भटक गई थी, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पाच वर्षांपूर्वी मी बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने माझे आयुष्य बदलले होते. माझा हा प्रवास प्रचंड थकवणारा होता. या पाच वर्षांत मी स्वत:शीच झगडले. पण इतक्या लहान वयात मी इतका मोठा संघर्ष करू शकत नाही. त्यामुळे बॉलिवूडशी नाते तोडत असल्याचे तिने सांगितले.

'दंगल' हा झायराचा पहिला सिनेमा होता. 2016 साली या सिनेमासाठी झायराला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या चित्रपटानंतर पुढच्याच वर्षी ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात झायरा झळकली होती. या सिनेमासाठीही तिला फिल्मफेअरचा बेस्ट अ‍ॅक्ट्रेस क्रिटिक्स हा पुरस्कार मिळाला होता.लवकरच झायराचा ‘स्काय इज पिंक’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यात प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहेत. झायराने खरोखरीच चित्रपट संन्यास घेतला असेल तर ‘स्काय इज पिंक’ हा तिचा अखेरचा चित्रपट असणार आहे.


 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

Dr. Anjali Nimbalkar : डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रचारातही निभावली ड्यूटी ; अपघातातील जखमीला उपचार करत स्वतः घातले टाके

SCROLL FOR NEXT