बातम्या

कोरोना निदानाची आता पुण्यासह मुंबई आणि नागपूरमध्येही व्यवस्था

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे - भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या सहकार्याने राज्यातील ‘विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळे’मध्ये (व्हीआरडीएल) कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या निदानाची व्यवस्था निर्माण केली. त्यातील एक प्रयोगशाळा मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात असून, दुसरी नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात आहे.

चीनसह काही देशांमध्ये उद्रेक झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग देशातील केरळपर्यंत पोचला आहे. त्यामुळे विषाणूबाधित देशांमधून आलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थांमध्ये (एनआयव्ही) ही तपासणी केली जात होती. राज्यात पुण्यातील ‘एनआयव्ही’च्या सोबत आता आणखी दोन प्रयोगशाळांमधून कोरोनाचे निदान करता येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. मुंबई आणि नागपूर येथील प्रयोगशाळांमधून ही सुविधा कार्यान्वित केल्याचे सांगण्यात आले.

केंद्र सरकारने राज्याच्या आरोग्य विभागाला दिलेल्या सूचनेनुसार, वुहान शहरातून येणाऱ्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या घशातील द्रवपदार्थांचे नमुने प्रयोगशाळांमधून तपासण्यात येत आहेत. मात्र, बाधित राज्यात येणाऱ्या प्रवाशांचा चौदा 
दिवसांसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. 

बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ११९ प्रवाशांपैकी ४० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासह नांदेड, बुलडाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर, अमरावती, पालघर, सातारा या जिल्ह्यांतूनही चीन आणि इतर बाधित भागांतून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

Web Title corona diagnosis now arranged pune and mumbai

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ मोदी घेणार बीडमध्ये सभा

Bike Stunt Video Viral: भयंकर! भररस्त्यात तरूणाची बाईकवर स्टंटबाजी, पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा

Jalana News: ब्रेकिंग! मंत्री रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घातला घेराव... जोरदार घोषणाबाजी; जालन्यात काय घडलं?

Nanded Accident : वऱ्हाडाच्या गाडीला अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो झाला पलटी, १५ वऱ्हाडी जखमी

Mango Health Benefits: उन्हाळ्यात दररोज खा एक कच्चा आंबा; होतील जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT