बातम्या

आता बुलेट ट्रेन व्हाया पुणे-औरंगाबाद!

साम टीव्ही न्यूज

मुंबई अहमदाबाद शिवाय राज्यात बुलेट ट्रेन सुरु करण्यासाठी दोन मार्गांचा अभ्यास सुरु असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.  मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनशिवाय महाराष्ट्रात आणखी दोन बुलेट ट्रेन सुरु करण्याबाबत रेल्वे प्रशासनाचा अभ्यास करतंय.  मुंबई ते औरंगाबादमार्गे नागपूर आणि मुंबई ते पुणे मार्गे हैदराबाद या मार्गावर बुलेट ट्रेन सुरु करता येऊ शकेल का याची चाचपणी सुरु आहे. प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मार्गानं सर्वेक्षण जून 2018 मध्ये स्पेनच्या इन्फो कंपनीने केले होते. मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर या मार्गाचा सर्वेक्षण अहवाल रेल्वेकडे सोपवण्यात आला असून त्याचा अभ्यास सुरु आहे. दरम्यान नुकताच बुलेट ट्रेनच्या प्रकल्पात नवीन सहा मार्गाचा समावेश करण्यात आला असून यात महाराष्ट्रातील दोन मार्गांचा समावेश आहे. या मार्गाचा अभ्यास पूर्ण होताच कामाबाबतचा निर्णय घेम्यात येणार आहे, तर उर्वरित चार मार्गाचा सर्व्हे लवकरच करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची उभारणी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लि. करणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

अशी असेल बुलेट ट्रेन

ताशी वेग 320 किलोमीटर

प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 7 वर्ष लागतील.

बुलेट ट्रेनचं तिकीट 2700 ते 3000 रुपयांपर्यंत

120 किलोमीटर महाराष्ट्रातून जाणार

वांद्रे, कुर्ला, बोईसर, विरार, ठाणे.

Web Title -  Bullet train via pune-aurangabad 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Crime News : 2 वर्षांपासून पोलिसांना देत होता चकवा; अखेर गुंड हितेंद्र ठाकूरला गुजरातमध्ये अटक

Maharashtra Rain Update: विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; घरांवरील पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली, पाहा VIDEO

Pat Cummins Statement: बॅक टू बॅक पराभवानंतर पॅट कमिन्स भडकला! पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

Today's Marathi News Live : हेमंत सोरेन यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर आज सुनावणी

Elon Musk: भारत भेट रद्द केल्यानंतर मस्क पोहोचले चीनमध्ये, भेटीचं कारण काय?

SCROLL FOR NEXT