बातम्या

साखर उद्योगाला भाभा अणुसंशोधन केंद्राचा दिलासा; साखर उत्पादनात 25% वाढ शक्य

अमोल कविटकर, साम टीव्ही, पुणे

वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट आणि मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या संयुक्त प्रयत्नातून ऑलिगोकायटोसॅन या जैवसंजीवकाची (बायोस्टिम्युलेटर) निर्मिती करण्यात आलीय. गॅमा किरणांच्या प्रक्रियेतून निर्माण करण्यात आलेल्या या जैवसंजीवकाच्या वापरामुळे उसाच्या उत्पादनात वीस टक्के आणि साखर उत्पादनात पंचवीस टक्क्यांची वाढ होणार आहे.

हे जैवसंजीवक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून त्याच्या फवारणीमुळे उसाच्या उगवण क्षमतेत लक्षणीय वाढ होते, कोंब लवकर आणि सशक्त निपजतात. फुटव्यांची संख्या, कांडय़ाची संख्या, पानांची लांबी आणि रुंदी, तसंच उसाच्याही जाडी आणि उंचीत वाढ होते. याशिवाय उसावरील रोगाचा प्रतिबंध होण्यास मदत होत असल्याचं दिसून आलंय. हे जैवसंजीवक फक्त उसासाठीच नव्हे तर बटाटा आणि कांदा  भुईमूग, हरभरा, सोयाबीन, आलं, हळद, ज्वारी, बाजरी, केळी, पपई, डाळिंब या पिकांसाठीही फायदेशीर ठरणार आहे.

लवकरच या जैवसंजीवकाचं व्यापारी पातळीवर उत्पादन होणार असून सामान्य शेतकऱ्यांसाठी त्याचा पुरवठाही लवकरच केला जाणार आहे. त्यामुळे सध्या अडचणीत आलेला साखर उद्योग अधिक किफायतशीर होणार आहे.

WebTitle : marathi news bhabha atomic research centres research on sugar production

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunny Leone: काळा ड्रेस, मोकळे केस; सनीचा बोल्ड अंदाज करतोय घायाळ

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून महिला भाविकास धक्काबुक्की

Mumbai Indians Playing XI: हैदराबादविरुद्ध अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार? पाहा कशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Solo Travel Tips: एकट्याने फिरायला जाण्याची आवड आहे;मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Baramati Constituency: हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT