बातम्या

#balareview आयुष्मानचा 'बाला' सुपर एन्टरटेनिंग

प्रेरणा जंगम

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुरानाने पुन्हा एकदा तो एक उत्तम कलाकार असल्याचं दाखवून दिलय. याचवर्षी आयुष्मान खुरानाचे 'आर्टिकल 15', 'ड्रीमगर्ल' आणि आता 'बाला' हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. त्यामुळे वर्षभर आयुष्मानने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. 'आर्टिकल 15' या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे 'ड्रीमगर्ल' चित्रपटातील आयुष्मानच्या भूमिकेचं कौतुक झालं. आणि आता 'बाला' बनून आयुष्मान प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.


तरुण वयात केस गळतीमुळे टक्कल पडलेल्या बाला या कानपूरमध्ये राहणारा तरुण या चित्रपटाचा नायक आहे. अकाली केसगळतीमुळे समाजात वावरताना वाटणारा संकोच, टकलेपणामुळे समाजाचं खिल्ली उडवणं, ते खटकणं या सगळ्या गोष्टी विनोदी पद्धतीन उत्तम पद्धतिने मांडण्यात आल्या आहेत. बऱ्याचदा चार्मिंग क्यूट बॉय साकारणारा आयुष्मान जेव्हा टक्कल असलेला तरुण साकारतो तेव्हा टकलेपणामुळे झालेला निराश तरुण त्याच्यात दिसतो. मात्र त्यासाठी विविध उपायही तो करतो. मात्र हे उपाय कितपत उपयोगी ठरतात आणि केस गळतीवर उपाय करत असताना कोणकोणते विनोदी प्रसंग येतात हे पाहणं रंजक आहे. काही प्रसंग आणि संवाद तर खळखळून हसवतात. केस गळतीवर विविध 'नुस्के' जेव्हा बाला अमलात आणतो आणि त्याचे मित्र, त्याचा भाऊ यात त्याला कसे मदत करत असतात हे पाहण्यात चांगलीच धमाल येते. या चित्रपटासाठी आयुष्मानने खरंखुरं टक्कल केलेलं नाही, मात्र उत्तम  मेकअपमुळे ते कुठेही जाणवत नाही. आयुष्मानने आत्तापर्यंत विविध विनोदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे, आणि याही चित्रपटात त्यानं कमाल कॉमेडी केली आहे.  


यामी गौतमच्या काबील चित्रपटातील भूमिकेचं कौतुक झालं होतं. आणि यावेळी लखनौची टीक टॉक स्टार तिने साकारली आहे. त्यात नेहमीच्या चित्रपटांतील भूमिकांचा तोच तोचपणा न आणता  त्या भाषेचा लहेजा पकडण्याचा प्रयत्न यामीने केला आहे. तर दुसरीकडे भूमी पेडणेकरचं कॅरेक्टरही पसंत केलं जात आहे. याचं मुख्य कारण म्हणजे काळा वर्ण असलेली तरुणी जिला लहानपणापासूनचं समाजाच्या टोमण्यांना सामोरं जावं लागलय, आणि आता वकिल म्हणून नोकरी करत असताना समाजाची पर्वा न करता बिनधास्तपणे वावारताना तिला दाखवलय. त्यामुळे भूमीचं कॅरेक्टरही भाव खाऊन जात आहे.


याशिवाय पूर्ण सिनेमाभर  सौरभ शुक्ला, जावेद जाफरी,सीमा पाहवा आणि इतर कलाकारांनीही कमाल काम केलेलं पाहायला मिळत आहे. चित्रपटात एक चांगला संदेश विनोदी पद्धतिनं मांडल्यामुळे हा सिनेमा मनोरंजक ठरतो.

Web Title :

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

Melava Teaser: वाघ नेमकी कुणाची शिकार करणार? ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या नव्या टीझरची चर्चा

Diabetes: हाय ब्लड शुगर असल्यास 'या' गोष्टी खाणं टाळा

Maharashtra Politics: मराठीवरून मविआत फूट? ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचा दुरावा

Fuel Ban Rules Update : भाजप सरकारचा यू-टर्न; थेट ६२ लाख वाहनधारकांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT