बातम्या

उच्चशिक्षित तरुणाने उन्हाळा सुरू होताच नोकरी सोडून टाकली

सकाळ न्यूज नेटवर्क

औरंगाबाद - एका मोठ्या कंपनीत फायर ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाने उन्हाळा सुरू होताच नोकरी सोडून रसवंती टाकली आहे. नोकरी करण्यापेक्षा या चार महिन्यांच्या उद्योगातून भांडवल उभे करून पुढे हॉटेल टाकण्याचा मानस त्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

नुकत्याच तापू लागलेल्या दुपारी अदालत रोडवर भरत साळुंके या तरुणाच्या रसवंतीत मात्र गर्दी असते. बांबू विकत आणून त्यापासून उभारलेल्या आकर्षक रसवंतीत चरकातून ऊस पिळणारा भरत एका कंपनीत चार वर्षे फायर ऑफिसर होता, हे कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही. बीड जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यातून आलेल्या या तरुणाने फायर इंजिनिअरिंग ॲण्ड सेफ्टी मॅनेजमेंटची पदवी मिळविली आहे. त्यानंतर चार-पाच वर्षांपासून नोकरी करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे पाहून त्याने रसवंतीचा हंगामी व्यवसाय करण्याचे ठरविले. काही मित्रांच्या साहाय्याने त्याने अदालत रोडवर रसवंती टाकली. स्वच्छ पाणी, चांगला बर्फ, गावरान उसाचा ‘गोडवा’ आणि थंडगार रस असा सगळा माहौल त्याने या ठिकाणी निर्माण केला आणि अल्पावधीतच ग्राहकांची रीघ लागली. 

व्यवसाय म्हटले, की प्रतिस्पर्धी येणारच. भरतलाही काही जणांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने चिकाटीने व्यवसाय सुरूच ठेवला. आता यातून चांगले उत्पन्न मिळत असून, उन्हाळा संपल्यावर हॉटेल व्यवसायाकडे वळणार असल्याचे त्याने सांगितले.

जिल्हा न्यायालयासमोरच ही रसवंती असल्यामुळे वकील आणि पक्षकार मंडळींची चहा पिण्यापेक्षा इथे रसवंतीवरच जास्त गर्दी असते. नोकरीच्या मागे लागणारे आणि हताश तरुण सगळीकडे दिसत असताना भरत साळुंके आदर्श व्यावसायिक बनू पाहत आहे. त्यामुळे त्याला हरप्रकारे मदत करण्याचे आम्ही ठरविले आहे.
- ॲड. तथागत कांबळे

Web Title: Fire Officer Youth started rasavanti in aurangabad

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : भोर तालुक्यातील बुरुडमाळमध्ये झालं शंभर टक्के मतदान

Nagpur News : महिलेचा मोबाईल नंबर घेण्यासाठी लावली ५० हजाराची पैज; तिघे मित्र पोलिसांच्या ताब्यात

PM Modi Rally: काँग्रेस, आरक्षण आणि 26/11; अहमदनगरमध्ये PM मोदींची विरोधकांवर चौफेर फटकेबाजी

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी सूर्याचा मास्टरप्लान! IPL दरम्यान करतोय खास सराव; स्वत:च केला खुलासा

LokSabha Election: सांगोल्यात EVM जाळलं; एकजण पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT