बातम्या

भारताचे महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं दीर्घ आजारानं निधन

सकाळ न्यूज नेटवर्क

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार (वय ७७) अजित वाडेकर यांचे आज (बुधवार) कर्करोगाने निधन झाले. त्यांना जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

१९६६ ते १९७४ या कालावधीत वाडेकर यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. 'वन डाऊन' फलंदाजी करणारे वाडेकर भारताच्या सर्वोत्तम स्लीप फिल्डर्सपैकी एक होते.

वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळविले. परदेशात कसोटी मालिका जिंकणारे वाडेकर हे पहिलेच भारतीय कर्णधार ठरले. याशिवाय, भारताच्या पहिल्या 'वनडे' संघाचेही ते सदस्य होते.

त्यांना १९६७ मध्ये 'अर्जुन', तर १९७२ मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आले होते. निवृत्तीनंतर १९९० च्या दशकात वाडेकर यांनी भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले होते. 

कसोटी संघाचे सदस्य, कर्णधार, व्यवस्थापक आणि निवड समितीचे अध्यक्षपद अशी सर्व ठिकाणी कामगिरी केलेल्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये वाडेकर यांचा समावेश होतो. वाडेकर यांच्याशिवाय लाला अमरनाथ आणि चंदू बोर्डे यांनीच अशी कामगिरी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunny Leone: काळा ड्रेस, मोकळे केस; सनीचा बोल्ड अंदाज करतोय घायाळ

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून महिला भाविकास धक्काबुक्की

Mumbai Indians Playing XI: हैदराबादविरुद्ध अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार? पाहा कशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Solo Travel Tips: एकट्याने फिरायला जाण्याची आवड आहे;मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Baramati Constituency: हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT