ajit pawar name still in ncp list jayant patil
ajit pawar name still in ncp list jayant patil 
बातम्या

पक्षातून हकालपट्टी होऊनही राष्ट्रवादीच्या यादीत अजित पवारांचे नाव कसे?

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई  - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्यांचे हजेरीचे पत्र सादर करून, अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण, या धक्कादायक घाडामोडीनंतर गेल्या 30 तासांत पुलाखालून बरच पाहणी वाहून गेलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बैठक घेऊन, अजित पवार यांची विधिमंडळ पक्ष नेते पदावरून हकालपट्टी केलीय. त्यानंतरही अजित पवार अद्याप पक्षात कायम आहेत. पक्षाच्या यादीत अजूनही अजित पवार यांचे नाव आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करून भाजपसोबत गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांवर पक्षाने कारवाई केली. अजित पवारांची धिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आलीय. त्यांचे सर्व अधिकार तुर्तास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडे सोपवण्यात आलेत. राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत अजित पवारांच्या हकालपट्टीचा एकमताने निर्णय घेण्यात आला.

कालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मोठ्या घडामोडी झाल्या. आमदारांनी एकमताने अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी केली. तसेच विधिमंडळातील सर्व निर्णयांचे अधिकार राष्ट्रवादीने जयंत पाटील यांना दिले. अद्याप सभागृहातील कामकाज सुरू झालेले नाही. विधानसभा अध्यक्ष निवड झालेली नाही. त्यामुळेच नियमानुसार पक्षाने घेतलेल्या या निर्णयाची माहिती राज्यपालांना देणे गरजेचे आहे. त्यामुळेच आज स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना पक्षाच्या निर्णयांचे पत्र दिले. जयंत पाटील यांनी राज्यपालांना दिलेल्या आमदारांच्या यादीत आश्चर्यकारकरित्या अजित पवार यांचेही नाव आहे.

अजित पवार यांची मनधरणी करायला आलोय 
दरम्यान, पक्षाबाहेर एकटे पडलेल्या अजित पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न आज दुसऱ्या दिवशीही राष्ट्रवादीकडून सुरू होता. त्यासाठी स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात जयंत पाटील म्हणाले, 'सर्व आमदार आता आमच्या संपर्कात आले आहेत आता अजित दादांनी एकटे बाहेर राहू नये. त्यामुळं आम्ही त्यांची मनधरणी करण्यासाठी आलो आहोत.' दरम्यान, आज सकाळी खासदार संजय काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट का घेतली याविषयी माहिती नाही, असे जयंत पाटील यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले.

Web Title: ajit pawar name still in ncp list jayant patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचं 'पानीपत'; IPLमधील कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

SCROLL FOR NEXT