बातम्या

विवस्त्र करुन आदिवासी महिलेला मारहाण; महाराष्ट्राला लाज आणणारी बातमी..

सकाळ न्यूज नेटवर्क

पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? असा विचार करायला लावणारी घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. केवळ शेतात शेळी शिरली या कारणावरुन, चक्क एका आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातीलच काही उच्चभ्रूंनी 12 सप्टेंबर रोजी ही मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे.

भाणगाव येथे राहणाऱ्या आदिवासी दाम्पत्याची शेळी गावातील वागस्कर यांच्या शेतात शिरल्याच्या कारणावरुन, काही लोकांनी पीडितेच्या नवऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मध्ये पडलेल्या पीडितेला उपस्थितांनी जातीवाचक शिवीगाळ करत, विवस्त्र करुन मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार करण्यास गेले असता, तक्रार खोटी असल्याचं सांगत नोंद करुन घेण्यास तीन दिवस टाळाटाळ केली. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर घटनेच्या तब्बल तीन दिवसांनंतर जयसिंग वागस्कर, संतोष वागस्कर, मनोहर वागस्कर, जेसीबी चालक लुटे अशा चौघांविरोधात ऍट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र घटनेला 15 दिवस उलटून गेल्यानंतरही एकाही आरोपीला अद्याप अटक न झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करण्यात येऊ लागली असून आरोपींकडून कुटुंबाला संपवण्याच्या धमक्याही मिळतायत. दरम्यान, न्याय न मिळाल्यास विष पिऊन आत्महत्येचा इशाराही पीडितेने दिला आहे.

WebTitle : marathi news ahemadnagar crime case of atrocity maharashtra  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Breaking: भाजप उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

Technology Tips: एसीची कूलिंग घरबसल्या वाढवायची आहे? फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स

Raigad News: अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला प्रकरण, भरत गोगावलेंच्या मुलासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Life Success Tips : शहाणे असाल तर आयुष्यातील 'या' गोष्टी कधीच कुणालाही सांगू नका, अन्यथा पश्चाताप होईल

Baramati Lok Sabha Election: बारामती लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी उदंड प्रतिसाद, 228 मतदारांनी बजावला हक्क

SCROLL FOR NEXT