बातम्या

Loksabha 2019 : अमितभाई हम आपके साथ है - उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क

अहमदाबाद : भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे विचार एक आहेत. विरोधी पक्षांकडे कोण नेता नाही. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन दाखवावे आणि एक पंतप्रधानपदाचे नाव घ्यावे, हे माझे त्यांना आव्हान आहे. आम्ही कधीच पाठीत खंजीर खुपसणार नाही. आपल्यासमोर विरोधी पक्षच नाही. अमितभाई हम आपके साथ है, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

अमित शहा शनिवारी गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. या कार्यक्रमाला एनडीएतील घटक पक्षांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ठाकरे उपस्थित राहिले आहेत. याबरोबरच रामविलास पासवान, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, सुखबिरसिंह बादल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही उपस्थित होते. 

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, की मी गांधीनगरमध्ये आल्याने अनेक जणांच्या पोटात दुखत आहे, त्याचा उपाय माझ्याकडे आणि अमितभाईकडे आहे. अमितभाईंना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. एकच विचारधारा असलेले पक्ष एकमेकांविरुद्ध लढत होते. अमितभाई आमच्याघरी आले, त्यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर कोणतेही मतभेद राहिले आहे. हिंदुत्त्व हीच विचारधारा दोऩ्ही पक्षांची आहे. पुन्हा आम्ही एकत्र आलो आहेत. 56 पक्ष विरोधात एकत्र आले आहेत. आमचे दिल मिल गये है. गेल्या पाच वर्षांत जे झाले ते झाले. पण, त्यापूर्वी 25 वर्षै हे दोन्ही पक्ष एक होते.

Web Title: Shivsena chief Uddhav Thackeray present BJP president Amit Shah rally in Gandhinagar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT