बातम्या

सुप्रसिद्ध अभिनेते, मृणाल कुलकर्णी यांचे सासरे जयराम कुलकर्णी यांचं निधन

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे : सुप्रसिद्ध चरित्र अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ८८ होते. ते 88 वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी आज  पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी बारा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जयराम कुलकर्णी यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली होती.

आकाशवाणीवरून प्रसारित होणारया अनेकविध कार्यक्रमांमधे त्यांचा सहभाग असे. जवळपास १०० मराठी आणि हिंदी चित्रपटांमधे त्यांनी चरित्र भूमिका साकारल्या. झपाटलेला, माहेरची साडी, नवरी मिळे नवरयाला, आमच्या सारखे आम्हीच अशा चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या.

मोरूची मावशी या नाटकात जयराम यांनी सर्वात पहिल्यांदा काम केले होते. शाळेपासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. स. प. महाविद्यालयात श्रीकांत मोघे, शरद तळवळकर यांच्यासोबत पुलंच्या ‘अंमलदार’ नाटकात ‘हणम्या’ ही भूमिका जयराम यांनी साकारली. तेव्हापासून खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा एकच नट अशी त्यांची नवीन ओळख निर्माण झाली.

Web Title: Actor Jairam Kulkarni Passed away

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT