बातम्या

हिमाचल प्रदेशात बस दरीत कोसळून 43 जणांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क

हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यातील बंजार ते गाडागुशैनी दरम्यान प्रवास करणारी खासगी बस ५०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश होता. ते महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन परतत असताना हा अपघात झाला.

राज्याचे परिवहन मंत्री गोविंद सिंह ठाकूर यांनी अपघातासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. कुल्लू  पोलीस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार,  (बस क्रमांक एचपी ६६-७०६५) जिल्ह्यातील  बंजार तालुक्यातील धोथ मोरजवळ ५०० फूट खोल दरीत कोसळली आहे.

ट्रॅफिकच्या समस्येमुळे बस नियोजित वेळेपेक्षा उशीराने बंजाराहून निघाली होती. ४२ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या बसमध्ये अधिक प्रवासी बसवल्याची माहिती समोर येत आहे. अपूऱ्या आणि चढ असलेल्या रस्त्यावरुन प्रवास करताना बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे ब्रेक न लागल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.  

Web Title: 43 killed in bus accident in Himachal Pradesh

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urvashi Rautela: ऋषभ पंतशी लग्न करणार का? चाहत्याच्या प्रश्नाला उर्वशी रौतेलानं दोन शब्दात दिलं उत्तर

Bachchu Kadu Sangali Speech |"जात-धर्माशिवाय तुम्हाला निवडणुका जिंकता येत नाही", बच्चू कडू बरसले!

Aditya Thackrey Full Speech Chiplun : भाजपला 200 पार करणे मुश्कील! आदित्य ठाकरेंचा मोठा दावा..

Ambernath : किराणा दुकानात क्राइम ब्रँचचा छापा, नेवाळी गावात मोठं घबाड सापडलं; पोलिसही चक्रावून गेले!

Murder in Mahim Trailer : सीरियल किलरच्या शोधात विजय राज आणि आशुतोष राणा, 'मर्डर इन माहीम' सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज

SCROLL FOR NEXT