बातम्या

उमर खालिदवर हल्ला करणारा सीसीटीव्हीत कैद

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेते उमर खालिद यांच्यावर हल्ला करणारा संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

उमर खालिद यांच्यावर सोमवारी (ता. 13) दुपारी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती. संसद भवनाजवळील कॉन्स्टिट्यूशन क्‍लबच्या बाहेर झालेल्या हल्ल्यातून ते सुखरूप बचावले. या वेळी हल्लेखोर पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया येथे सोमवारी दुपारी युनायटेड अगेन्स्ट हेट संघटनेच्या वतीने "खौफ से आझादी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उमर खालिद आले होते. क्‍लबजवळ असलेल्या एका चहाच्या टपरीवर उमर खालिद उभे असताना अचानक एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यातून उमर खालिद बालंबाल बचावले. खालिद यांच्यासमवेत असलेल्या सैफीने सांगितले, की आम्ही चहा पिण्यासाठी गेलो होतो. त्याचवेळी आमच्याकडे तीन जण आले. त्यापैकी एकाने खालिदला पकडले. या वेळी खालिद यांनी स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अचानक गोळीचा आवाज आला आणि घटनास्थळी घबराटीचे वातावरण पसरले. तसेच हल्लेखोराने पळून जाताना आणखी एक गोळी झाडली.

याबाबत खालिद म्हणाले, 'की देशात दहशतीचे वातावरण आहे. सरकारविरुद्ध बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धमकावले जात आहे. याप्रकरणाचा पोलिस तपास करत असून शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. हल्लेखोर पळून जात असताना पिस्तूल घटनास्थळी पडले होते.'

खालिद यांच्यावर हल्ला करणारा संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pm Modi In Satara: मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Kajol Devgan : “…तुझी नाटकं बंद कर”; चाहत्यासोबत उद्धटपणे वागल्यामुळे काजोल झाली ट्रोल, पोस्ट व्हायरल

Today's Marathi News Live : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्या निवडणुकीचे चिन्ह 'रोड रोलर'

Maharashtra Weather Update: मुंबई ठाण्यासह रायगडला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा!

Raj Thackeray: रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडल्यानंतर आता राणेंसाठी राज ठाकरे मैदानात!

SCROLL FOR NEXT