बातम्या

महाराष्ट्रात 1076 रुग्ण कोरोनामुक्त मात्र तितक्याच झपाट्याने कोरोनाबाधितांचीही वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क

 राज्यात कोरोना संसर्गाचा कहर जरी कायम असला तरी कोरोना संसर्गातून बरे होणाऱ्यांची संख्याही दररोज वाढत आहे. आजपर्यंत राज्यभरात १ हजार ७६ रुग्ण या आजारातून ठणठणीत बरे झाले आहेत. यामध्ये मुंबईतील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या ६ हजार २२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे असले तरीही अद्याप नागरिकांना खूप काळजी घेण्याची गरज आहे. कारण कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतोय. राज्यात काल कोरोनाचे 522 नवीन रुग्ण आढळलेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 8590 वर गेलाय. सोमवारी राज्यात तब्बल 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर 94 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तर मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 5776 वर पोहचलीय. मुंबईत आतापर्यंत 219 जणांचा मृत्यू झालाय.

मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे धास्ती वाढलेली असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईची आहे. या शहरातून ७६८ रुग्ण बरे झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात १२० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतेय. २३ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत साधारणत: महिन्याभरात १ हजार ७६ रुग्ण घरी गेले आहे. हे प्रमाण पाहता राज्यात दररोज सुमारे २६ रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.

यामध्ये अहमदनगर महापालिका ५, अहमदनगर ग्रामीण ११, औरंगाबाद महापालिका १४, बुलढाणा ८, गोंदीया, हिंगोली, जळगाव महापालिका प्रत्येकी १, कल्याण-डोंबिवली ३१, कोल्हापूर महापालिका २, लातूर ग्रामीण-८, मीरा भाईंदर मनपा-५, मुंबई महापालिका ७६८, नागपूर महापालिका १२, नाशिक महापालिका आणि ग्रामीण प्रत्येकी १, नवी मुंबई १९, उस्मानाबाद ३, पालघर ग्रामीण १, पनवेल महापालिका १३, पिंपरी-चिंचवड महापालिका १२, पुणे महापालिका १२०, पुणे ग्रामीण ५, रायगड ग्रामीण ३, रत्नागिरी , सांगली ग्रामीण- २६, सातारा- ३, सिंधुदूर्ग-, ठाणे मनपा १६, ठाणे ग्रामीण- ४, उल्हासनगर मनपा- १, वसई-विरार महापालिका १२ यवतमाळ ७ यांचा समावेश आहे.

प्लाझ्मा थेरपीचा आधार

कोरोना बाधितांवर उपचारासाठी आता प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांवरील प्लाझ्मा थेरपीला केंद्र सरकारची परवानगी मिळाल्याने मुंबई आणि पुणे शहरात प्रायोगिक तत्वावर सुरूवात केली आहे. प्लाझ्मा थेरपीसाठी लागणारी प्रक्रिया पूर्ण होऊन कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांकडून प्लाझ्मा युनिट कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी वापरणार आहेत. हा उपचार पात्र ठरलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार देण्यात येणार आहे. 

या रुग्णांची रक्त गट तपासणी करून प्लाझ्मा जुळविण्यात येणार आहेत. या प्रक्रियेसाठी लागणारा प्लाझ्मा फेरेसिस मशीन तयार करण्यात आले आहे. यामुळे कोरोना आजारापासून बरे झालेल्या रुग्णांना बोलावून प्लाझ्मा चे विलगिकरण करण्याची प्रक्रिया जलद गतीने व प्रभावीपणे करणे शक्‍य होईल. या थेरपीचा लाभ गंभीर प्रकारच्या रुग्णांना होईल. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना या आजारातून लवकर बरे होण्यास मदत मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : गुजरातला विरोध कधीच नव्हता, पण... ; उद्धव ठाकरे अलिबागमधून भाजपवर कडाडले

Maharashtra Politics: '...म्हणून ते शपथविधीला आले होते', प्रफुल्ल पटेलांचं अमोल कोल्हेंबद्दल स्फोटक विधान

IPL Orange Cap: विराटचा ऑरेंज कॅपवर कब्जा! पाहा टॉप ५ फलंदाज

Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा

Baramati News: मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा; मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

SCROLL FOR NEXT