bhagatsinh koshyari
bhagatsinh koshyari  
बातम्या

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीचा शोध आज लागणार?

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद सदस्य नेमणूक करण्यासाठी ज्या 12 लोकांची नावे पारित करुन राज्यपालाकडे Governor मंजुरीसाठी पाठविली होती ती यादी माहिती अधिकारात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली होती. The list of 12 members sent by the Cabinet is not available with the Governor

आज मंगळवारी 15 जून रोजी राजभवन सचिवालयात याबाबत अनिल गलगली यांनी दिलेल्या आव्हान अपिलावर सुनावणी होणार आहे. यादी खरोखरच उपलब्ध आहे किंवा नाही? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

आरटीआय RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे  दिनांक 22 एप्रिल 2021 रोजी माहिती विचारली होती की मुख्यमंत्री महोदय / मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य नेमणुकीबाबत, राज्यपाल महोदयांकडे सादर केलेली यादी देण्यात यावी.

तसेच मुख्यमंत्री महोदय / मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य नेमणुकीबाबत राज्यपाल महोदयांकडे सादर केलेल्या प्रस्तावाची सद्यस्थितीची माहिती देण्यात यावी.

हे देखील पहा -

अनिल गलगली यांच्या अर्जावर 19 मे 2021 रोजी राज्यपाल सचिवालयाचे अपर सचिव जयराज चौधरी यांनी उत्तर देत कळविले की, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची यादी जन माहिती अधिकारी ( प्रशासन) यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याने, आपणास उपलब्ध करुन देता येत नाही.

अनिल गलगली यांनी संभ्रमित करणाऱ्या माहिती बाबत प्रथम अपील दाखल केले असून आज मंगळवारी, 15 जून रोजी सकाळी 11.30 वाजता अपीलावर सुनावणी होणार आहे. राज्यपालांच्या उप सचिव असलेल्या प्राची जांभेकर या सुनावणी घेत निर्णय देतील.

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Orange Cap: विराटचा ऑरेंज कॅपवर कब्जा! पाहा टॉप ५ फलंदाज

Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा

Baramati News: मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा; मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचं ब्रेकअप ?, लग्नाच्या चर्चांदरम्यान नात्यात दुरावा

Today's Marathi News Live : मनसेचे माजी सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT