nitesh rane
nitesh rane  
बातम्या

ठाकरे सरकारकडून कोकणाला 'खोदा पहाड निकाला चूहा' नुकसानभरपाई - नितेश राणे

भूषण अहिरे

सिंधुदुर्ग - तौक्ते Tauktae चक्रीवादळाने Cyclone नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या मंत्रांनी कोकण दौरा केला परंतु सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई म्हणजे "खोदा पहाड निकला चूहा" अशा प्रकारची नुकसान भरपाई आमच्या कोकणाला महाविकास आघाडी सरकारने दिलेली आहे. Khoda Pahad Nikala Chuha compensation to Konkan from Thackeray government - Nitesh Rane

जिथे मच्छिमारांचे लाखोंचे नुकसान झालेले आहे तिथे फक्त 50 हजार पर्यंतची मदत दिली आहे. हेक्टरी 50 हजार मदत सांगितली आहे म्हणजे एका आंब्याच्या झाडाला 500 रुपये तर नारळाच्या झाडाला 250 रुपये, टपरीला 10 हजार रुपये ,एवढे सगळे आकडे आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या CM Uddhav Thackeray मुलाचा खर्च तरी एवढा आहे का? जी काही कोकणाला मदत केली आहे ती म्हणजे एकप्रकारची थट्टा आहे.  पंचनामे कशासाठी केले आमची आमची थट्टा करण्यासाठी की मजाक उडवण्यासाठी केले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

हे देखील पहा -

एका बाजूला लाखोंचे करोडोंचे  नुकसान झालेले आहे आणि निर्लज्जपणे केंद्राकडे दोन हजार कोटी मागायचे आणि इथे फक्त अडीच कोटी रुपये द्यायचे असं हे निर्लज्ज ठाकरे सरकार आहे. या सरकारने Government कोकणी माणसाला अक्षरशः वाऱ्यावर सोडलेले आहे देखील नितेश राणे Nitesh Rane म्हणाले. 

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: आईच्या कुशीत झोपलेलं ८ महिन्यांचं बाळ अज्ञाताने चोरलं; पुण्यातील धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

Sahil Khan : अभिनेता साहिल खान मुंबई पोलिसांच्या ताब्यात; महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मोठी कारवाई

Nandurbar Water Crisis: नंदुरबारमध्ये दुष्काळच्या झळा! एक हंडा पाण्यासाठी वणवण; महिलांना करावी लागतेय २-३ किमी पायपीट

Accident News: अज्ञात वाहनाच्या धडकेत २ तरुणांचा जागीच मृत्यू, हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Petrol Diesel Rate 28th April 2024: पेट्रोल-डिझेल स्वस्त की,महाग? जाणून घ्या महाराष्ट्रासह इतर राज्यातील आजचा भाव

SCROLL FOR NEXT