बातम्या

मसूद अजहर पाकिस्तानातच; पाकच्या मंत्र्यांची कबुली

सकाळ न्यूज नेटवर्क

इस्लामाबाद : जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर हा पाकिस्तानात असल्याची कबुली पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली आहे. ""मसूद हा पाकिस्तानात असून, सध्या तो आजारी आहे. भारताने ठोस आणि न्यायालयात टिकू शकतील असे पुरावे सादर केले, तर मसूदच्या विरोधात पाकिस्तान सरकार कारवाई करू शकते,'' असे स्पष्टीकरण पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी दिले. 

पुलवामातील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कुरेशी यांच्या आजच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. पुलवामातील हल्ल्यात "जैशे महंमद'चा हात असल्याबद्दल आणि या संघटनेचे तळ आणि म्होरकेही पाकिस्तानातच असल्याबाबतचे ठोस पुरावे भारताने पाकिस्तानकडे सुपूर्त केले आहेत. कुरेशी यांनी "सीएनएन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताचा दावा मान्य केला आहे. मसूदबद्दल बोलताना कुरेशी म्हणाले, की मसूद हा पाकिस्तानात असल्याची माहिती मिळाली आहे. मसूद सध्या आजारी असून, तो घर सोडण्याच्याही स्थितीत नाही. 

पाकिस्तानच्या न्यायालयात टिकू शकतील असे पुरावे भारताने दिले तर मसूदच्या विरोधात पाकिस्तान सरकार कारवाई करू शकते, असे कुरेशी म्हणाले. पाकिस्तानातील नागरिक आणि न्यायव्यवस्थेचे समाधान करू शकतील असे पुरावे भारताने द्यावेत, असेही ते म्हणाले. 

शांतता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय वैमानिक अभिनंदन यांना मुक्त करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. वाढता तणाव कमी करण्यासाठी केलेली कृती म्हणूनच त्याकडे पाहावे. 
- शाह मेहमूद कुरेशी, पाकचे परराष्ट्रमंत्री 
 

Web Title: JeM chief Masood Azhar is in Pakistan, admits Pakistan foreign minister

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT