jawan.
jawan. 
बातम्या

गोंदिया जिल्ह्यातील जवान प्रमोद कापगते नागालँडमध्ये शाहिद

दिनेस पिसाट

काल पहाटे नागालँडमध्ये (Nagaland) उग्रवादी आणि सीआरपीएफच्या (CRPF) जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये गोंदिया (Gondia) जिल्हयातील सडक अर्जुनी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या परसोडी, गावातील शहीद जवान प्रमोद कापगते (CRPF jawan Pramod Kapgate), यांना गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पार्थवी आज रात्री उशिरा पर्यंत त्यांच्या स्वगावी आणण्यात येणार आहे. मात्र प्रमोद यांचा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र त्यांच्या कुटूंबियांना अजूनही स्पष्टपणे माहित नसल्याने कुटंबीयांनी केंद्र सरकार आणि सैन्य दलावर नाराजी व्यक्त केली आहे.(Jawan Pramod Kapgate from Gondia district martyred in Nagaland) 

प्रमोद कापगाते हे 2001 मध्ये सैन्य दलात रुजू झाले होते.  त्यांनी नुकतेच आपल्या सेवेचा पहिला टप्पा गाठत देश सेवेचे 20 वर्षे 10 एप्रिलला पूर्ण केले होते. प्रमोद हे सेवानिवृत्ती घेऊन या महिन्यात स्वगावी परत येणार होते असल्याची माहिती त्यांनी आपल्या पत्नी आणि कुटूंबियांना फोनद्वारे दिली होती. तसे कागद पत्रे देखील त्यांनी सैन्य दलाच्या अधिकाऱ्याकडे दिली होते. मात्र सेवानिवृत्ती घेतल्यावरही ते कर्तव्यावर कसे रुजू होते? आणि  त्यांचा मृत्यू कशामुळे झाला? हे मात्र कुटूंबियांना स्पष्ट कळू शकलेले नाही. काल सकाळी साडे सहा वाजे दरम्यान सैन्य दलाच्या एका अधिकऱ्याने फोन करीत प्रमोद कापगते, हे शहिद झाल्याची माहिती दिली. त्यानंतर कापगते कुटुंबियांना धक्का बसला.

हे देखील पाहा

देशाच्या सेवे करीता मुलाला पाठविले, मात्र त्याचा मृत्यू कशाने झाला आहे हे देखील कळू न शकल्याने कुटूंबियांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. तर या संदर्भात गोंदिया जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली असता त्यांना देखील शहीद प्रमोद कापगते, यांचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती दिली नाही.  तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे आज गोंदिया जिल्हयाच्या दौऱ्यावर असताना शहीद कुटूंबियांची भेट घेणार आहेत. 

Edited By : Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Hike 2024 : यंदा नोकरदारांच्या पगारात होणार भरघोस वाढ! किती वाढणार तुमची सॅलरी?

Kalyan Murbad Railway Line: कल्याण मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला शेतक-यांचा विरोध, पाेलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदाेलन शमले

Herbal Tea पिणं आरोग्यासाठी लाभदायी

Accident News: भरधाव पिकअप अनियंत्रित होऊन टेम्पोला धडकला; भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू, थरारक VIDEO

Tulsi Vastu Tips: सकाळी तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ काय?

SCROLL FOR NEXT