बातम्या

सत्ताधाऱ्यांची जाण्याची वेळ आली आली आहे, भविष्यकाळ आपलाच- राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क

पंचवटी - प्रत्येक राजकीय पक्षाचे जसे चांगले दिवस येतात, तसे वाईट दिवसही बघावे लागतात. आता वातावरण बदलत असून, सत्ताधाऱ्यांची जाण्याची वेळ आली आली आहे. लक्षात ठेवा भविष्यकाळ आपलाच आहे. मोठ्या भरारीसाठी सज्ज व्हा, असा आशावाद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना देऊन पक्षात चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला. 

पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी औरंगाबाद रोडवरील लक्ष्मी लॉन्स येथे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, मनसेचे गटनेते सलीम शेख, शहराध्यक्ष अनिल मटाले, प्रदेश सरचिटणीस राहुल ढिकले, माजी महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, रतनकुमार इचम, शहराध्यक्ष अनिल मटाले, पंचवटी विभागप्रमुख भाऊसाहेब निमसे, नाशिक रोड विभागप्रमुख साहेबराव खर्जुल आदी उपस्थित होते. 

श्री. ठाकरे म्हणाले, की आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करेन, प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतल्या जातील. काही सांगायचे असल्यास माझ्याकडे बंद लिफाफ्यामध्ये आपले नाव, पदासह लेखी स्वरूपात राहुल ढिकले किंवा अशोक मुर्तडक यांच्यामार्फत पाठवाव्यात. व्यक्तिगत तक्रारी करू नये, असा सल्ला दिला. 

वातावरण बदलतेय... 
जिल्हा दौऱ्यावर असताना फोटो बघितलेच असतील, असे सांगताच सभागृहातून एकसुरात होकार आला. आता तुम्ही समजलेत, बाकीच्यांना आपोआप समजून जाईल, असे सांगत विरोधी पक्षांना ठाकरे यांनी सूचक सल्ला दिला.

Web Title: It's time for the ruling party to go, the future ours - Raj Thackeray

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips: जड कानातले घातल्यानंतर तुमचेही कान दुखतात? मग या टीप्स ट्राय तर करा.

Skin Care Tips: चेहऱ्यावर कोरियन ट्रिटमेंट सारखा ग्लो हवाय? मग मधासोबत 'या' गोष्टी अप्लाय करा

Akola Crime: खिडकीतून आतमध्ये प्रवेश... अकोल्यात प्रसिद्ध उद्योजकाचे घर फोडले; २ कोटींचा मुद्देमाल लंपास

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये जाहीर सभा

Naach Ga Ghuma Film : "सगळं एकदम चोख, कौतुकासाठी शब्दच अपूरे..."; ‘नाच गं घुमा’ पाहताच प्राजक्ता माळी काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT