sangali lockdown
sangali lockdown 
बातम्या

सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये वाढ; पाहा काय सुरु? काय बंद?

साम टीव्ही न्यूज .

कोरोनाची साखळी (Coronavirus) तोडण्यासाठी सांगली (Sangali) जिल्ह्यात एक जूनपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या काळात पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. संचारबंदी लागू असल्याने किराणा, दूध, फळे, भाजीपाला यांना घरपोच पोहचवण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे. 19 मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत बुधवारी सकाळी 7 वाजेपर्यंत आहे. परंतु या कडक लॉकडाउनच्या काळातही कोरोनाची साखळी तुटलेली नाही. रुग्णसंख्या स्थिर असली तरी पॉझिटिव्हिटी रेट 20 ते 22 टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जिल्हा रेडझोनमध्ये आहे. त्यांमुळे 1 जून 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. (Increase in lockdown in Sangli district )

हे राहणार सुरू
- दुध विक्री केंद्रे ही सकाळी 7 ते 9 पर्यंत सुरु राहतील.

- किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते, पशुखाद्य यांना सकाळी ७

- ते रात्री 8 वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्यात येईल.

- शेतीविषयक सेवा व शेतीसाठी आवश्यक असणारी बियाणे, खते, 

-शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती सेवा देणारे व देखभाल पुरविणाऱ्या  सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु राहतील.

हे राहणार बंद
- जिल्ह्यात संचारबंदी व जमाव बंदी लागू राहील

- जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

- वैध कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी  बंदी. 

- अत्यावश्यक सेवा वगळता आस्थापने, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा   बंद राहतील. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT