बातम्या

पाच कोटी खर्च करून पोलीसांच्या मुलांसाठी वसतिगृह उभारणार -चंद्रकांत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क

राज्यभरातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या पोलिसांच्या मुलांसाठी पाच कोटी रुपये खर्च करून वसतिगृह बांधण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पुणे - जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधीतून पालखीतळांच्या ठिकाणी हर्बल औषध फवारणी आणि निर्जंतुकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णांचे कपडे, बेडशीट धुण्यासाठी ससून रुग्णालयाला धुलाई यंत्रासाठी १ कोटी ३० लाख रुपये देण्यात येतील. तसेच, राज्यभरातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या पोलिसांच्या मुलांसाठी पाच कोटी रुपये खर्च करून वसतिगृह बांधण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्‍त कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची आढावा  बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, की जिल्हा वार्षिक योजनेत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ५२१ कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यापैकी ३१६ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून १७२ कोटींचा निधी वितरित केला आहे. अनुसूचित जाती योजनेंतर्गत १०२ कोटी ८० लाखांचा निधी प्राप्त असून, ७९ कोटी ३४ लाख रुपये वितरित  केल्याचेही त्यांनी सांगितले. कामगार राज्यमंत्री संजय भेगडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, अमर साबळे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार दिलीप वळसे पाटील, नवल किशोर राम, संदीप पाटील आदी उपस्थित होते. 

आदिवासी योजनेसाठी ३१ कोटी रुपयांचा निधी 
आदिवासी योजनेंतर्गत ३१ कोटी ७९ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १० कोटी ३६ लाख रुपयांचा निधी वितरित केला असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 

Web Title: The hostel will be constructed at a cost of Rs five crore for the children of the police, said Chandrakant Patil
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SCROLL FOR NEXT