rohit sharma
rohit sharma 
बातम्या

हिटमॅननं ''या'' फलंदाजाच्या बॅटनं झळकावलं होतं पहिलं अर्धशतक; जाणून घ्या

अक्षय कस्पटे

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने मोठा खुलासा केला आहे. कार्तिक म्हणाला सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आपल्या फलंदाजीद्वारे भारतासाठी पहिले अर्धशतक दिनेश कार्तिकच्या बॅटने ठोकले होते. २०१९ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपासून संघाबाहेर असलेल्या दिनेश कार्तिकने २००७ च्या टी -२० विश्वचषक स्पर्धेतील एक किस्सा सर्वांसोबत शेर केला आहे.  जेव्हा डर्बन येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना खेळला जात होता. दिनेश कार्तिक या सामन्याच्या पाचव्या षटकात शून्यावर बाद झाला.(Hitman hit Dinesh Karthik's bat for the first half century)

यानंतर रोहित शर्माने दिनेश कार्तिकला त्याची बॅट मागितली आणि त्यानंतर ४० चेंडूत नाबाद अर्धशतक झळकावले. रोहित शर्माने आपल्या खेळीत दोन षटकार आणि सात चौकार लगावले होते. या सामन्यात रोहित शर्माने एमएस धोनीबरोबर ८५ धावांची भागीदारी देखील केली होती.  या सामन्यात धोनीने ३३ चेंडूत ४५ धावा बनवल्या होत्या.

हे देखील पाहा

दिनेश कार्तिक गौरव कपूरशी ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स शोमध्ये बोलताना म्हणाला की रोहित शर्माचे पहिले अर्धशतक माझ्या बॅटने बनवले गेले आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. जेव्हा मी त्याच सामन्यात शून्यावर बाद होऊन बाहेर पडलो तेव्हा मी म्हणालो की ही बॅट काहीच उपयोगाची नाही, परंतु रोहित म्हणाला, "ही बॅट चांगली नाही का, ती मला दे?" यानंतर त्याने या बॅटने शानदार अर्धशतक झळकावले.

कार्तिक म्हणाला माझ्या बॅटला कोणतेही श्रेय जात नाही याचे श्रेय रोहितला दिले पाहिजे.  परंतु हे माझ्यासाठी बरेच काही आहे. या सामन्यात भारतीय संघाने ११ षटकांत ४ गडी गमावून ६१ धावा केल्या पण त्यानंतर रोहित शर्माच्या खेळीच्या जोरावर संघाची धावसंख्या १५३ वर पोहोचली होती. 

Edited By : Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Tendulkar चा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

Today's Marathi News Live : मी देखील विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात पावलं उचलणार; उज्वल निकम

Sharad Pawar : जरा जपून, सरळ करायला वेळ लागणार नाही; शरद पवारांनी भर सभेत भरला आमदाराला दम

Ruchira Jadhav : मराठमोळा लूक अन् दाक्षिणात्य अंदाज, रुचिरा जाधवचं सुंदर फोटोशूट

Beed News: ताई तुम्ही रस्ता दिला, आता गाडीही द्या; महिलेची मागणी ऐकताच पंकजा मुंडेंनी थेट फोनच लावला

SCROLL FOR NEXT