Saam Banner Template (26).jpg
Saam Banner Template (26).jpg 
बातम्या

आज पुन्हा सोनं-चांदीच्या दरात घसरण 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - मंगळवार 8 जून रोजी एमसीएक्स वर सोन्याचे Gold दर उतरले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने सोन्याच्या किंमती खाली आल्या आहे. ८ जून रोजी एक्सचेंज उघडल्यानंतर ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे  ४३ रुपयांनी घसरून ४९,१०० आले आहे. त्याच वेळी चांदीचा Sliver दर देखील खाली आला आहे.  Gold silver prices fall again today

आधीच्या सत्रात एमसीएक्स वर सोन्याचे दर घसरणीनंतर  ४९,१३१ रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे  ०.३ टक्क्यांनी कमी होत ७१,६१९ रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. गेल्या आठवड्यातील महागाईच्या अंदाजामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर ५ महिन्यातील सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते.

यावेळी दर साधारण ४९,७०० रुपये प्रति तोळाच्या आसपास होते. दरम्यान असे असले तरीही हा भाव गेल्यावर्षीच्या सर्वोच्च स्तरापेक्षा जवळपास ७००० रुपयांनी कमी आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर हे ५६,२०० रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. Gold silver prices fall again today

हे देखील पहा -

सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात घसरणीमुळे दिल्लीमध्ये सोन्याच्या दारात घसरण पाहायला मिळाली. १५२ रुपयांच्या घसरणीनंतर याठिकाणी सोन्याचे दर प्रति तोळा ४८,१०७ रुपयांवर पोहोचले होते. चांदीचे दर देखील ५४० रुपयांनी कमी होऊन ६९,९२५ रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,८८३ डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव २७.५५ डॉलर प्रति औंस होता.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

SCROLL FOR NEXT