बातम्या

मोबाईलमध्ये गेम खेळायला न दिल्यामुळे केला वडिलांचा खून 

सकाळ न्यूज नेटवर्क

बेळगाव  : कायम मोबाईमध्ये गेम खेळण्यात व्यस्त पाहणाऱ्या मुलाला समज दिल्याने व नवीन मोबाइल घेण्यास पैसे न दिल्याच्या रागातून रागाच्या भरात मुलाने वडिलांचा खून केला. मुलाने वडिलांचे शिर धडावेगळे केले.

शंकऱ्याप्पा रेवप्पा कुंभार (६१, सिद्धेश्वर गल्ली, काकती) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी त्यांचा मुलगा रघुवीर कुंभार (वय २१) याला अटक केली आहे.

रघुवीर हा मेकॅनिकल डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. त्याला मोबाईलचे मोठया प्रमाणात वेड होते त्यामुळे कायम मोबाईल मध्ये व्यस्त असायचा. यामुळे वडिलांनी त्याला अनेकदा समज दिली. तो सतत पब-जी गेम खेळत होता. शिवाय वडिलांकडे नवीन मोबाईलसाठी पैसेदेखील मागत होता. परंतु, वडील देत नसल्याने तो चिडचिड करत होता. याच रागातून रघुवीरने रविवारी शेजारील घरांच्या खिडक्यांवर दगडफेक केली होती. त्यामुळे हे प्रकरण पोलिसात गेले होते. 

रविवारी रात्री घरी आल्यानंतर बाराच्या सुमारास मुलगा पुन्हा मोबाईलमध्ये मग्न झाला. हे पाहून वडिलांनी त्याला पुन्हा फैलावर घेतले. याचाच राग धरून मुलाने आज पहाटे आई महादेवी यांना एका खोलीत कोंडले. वडिलांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. वडील त्याला आवरण्याचा प्रयत्न करत असताना त्याने वडिलांच्या गळ्याला धरत ढकलून खाली पाडले. यानंतर, घरातील विळीने त्यांच्या गळ्यावर वार केला. क्रूर बनलेल्या मुलाने नंतर वडिलांचे शीर धडावेगळे केलेच. शिवाय त्यांचा उजवा पायदेखील तोडला घटनेची माहिती मिळताच काकतिचे पोलिस निरीक्षक श्रीशैल कौजलगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.


Web Title: Father murdered for refusing to play games in mobile
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election: नगरमध्ये महाविकास आघाडीत फूट! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा सुजय विखेंना पाठिंबा; निलेश लंकेंना बालेकिल्ल्यात धक्का

Maharashtra Weather Forecast: पुणे, ठाणे आणि रायगडसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीची शक्यता

Delhi School Bomb Threat: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी प्रकरण, दिल्ली सरकारने शिक्षकांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक; १ ठार २ जखमी, वाशिममधील घटना

Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

SCROLL FOR NEXT