Saam Banner Template
Saam Banner Template 
बातम्या

इंग्रजीवरून भारतीयांची थट्टा करणं इंग्लंडच्या खेळाडूंना पडणार महागात

वृत्तसंस्था

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात पदार्पण करणारा इंग्लंडचा क्रिकेटपटू ऑली रॉबिन्सन (Ollie Robinson) याला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ८ वर्षापूर्वी वर्णभेदाच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले. इंग्लंड बोर्ड आता रॉबिन्सनच्या जुन्या ट्वीटची चौकशी करत आहे. त्याचबरोबर या घटनेननंतर इंग्लंडलाच्या इतर खेळाडूंचे जुने ट्विटही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गन (Eoin Morgan) आणि जोस बटलर (Jos Buttler) यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये हे दोन खेळाडू भारतीय लोकांच्या इंग्रजीची थट्टा करीत आहेत. जे इंग्लंड बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांच्या विरुद्ध आहे. व्हायरल होत असलेल्या मॉर्गन आणि बटलरची ट्वीट २०१८ ची आहेत.

बटलर आणि मॉर्गन वारंवार त्यांच्या ट्विटमध्ये 'सर' हा शब्द वापरत आहेत. आणि तोडकी मोडकी इंग्रजी लिहून एकमेकांना प्रत्युत्तर देत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) सध्याचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या ट्विटवर इंग्लंडच्या दोन्ही खेळाडूंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांच्या उत्तरामध्ये 'सर' हा शब्द वापरला आहे आणि तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये ते उत्तर देत आहेत. मॉर्गन सध्या आयपीएलमध्ये केकेआर संघाचा कर्णधार आहे, तर जोस बटलर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला आहे.(The England players will be questioned over the controversial tweet)

हे देखील पाहा 

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बटलर आणि मॉर्गन यांच्या या ट्विटचे स्क्रीनशॉट पाहून चौकशीचे आदेश दिले आहेत. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने  संबंधित व योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून प्रत्येक प्रकरणावर स्वतंत्र विचार केला जाणार असल्याचेही इंग्लंडच्या बोर्डाने सांगितले आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर रात्री थरार; चिकन तंदुरीवरून वाद उफाळला, तरूणाला रस्त्याच्या मधोमध संपवलं

Today's Marathi News Live : पंतप्रधान मोदींचा आज पुण्यात मुक्काम

Maharashtra Election: इंडिया आघाडीचं सरकार आलं तर कोण होणार पंतप्रधान? पटोलेंनी उघडं केलं गुपित

Aligarh News : मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला; नवरा-बायकोवर गुन्हा

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

SCROLL FOR NEXT