Drishyam
Drishyam 
बातम्या

`दृष्यम`च्या सिक्वेलच्या काॅपीराईटचा मुद्दा उच्च न्यायालयात

साम टिव्ही ब्युरो

मुंबई  : सुपरहिट चित्रपट `दृष्यम` Drishyam च्या सिक्वेलच्या काॅपीराईटचा मुद्दा आता मुंबई उच्च न्यायालयात Mumbai High Court दाखल झाला आहे. `वायकाॅम १८`ने पॅनोरमा स्टुडिओ इंटरनॅशनलच्या विरोधात न्यायालयात याचिका केली आहे. Drishyam Sequel row in Mumbai High Court

अभिनेता अजय देवगण Ajay Devgan आणि अभिनेत्री तब्बू Tabbu यांचा `दृष्यम` चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. मूळच्या दाक्षिणात्य भाषेत असलेल्या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क `वायकाॅम`कडे आहेत. कंपनीने वाईड अँगल क्रिएशन्स आणि राजकुमार थिएटर प्रा. लि. यांच्याशी त्याबाबत करार केला आहे. त्यामुळे पॅनोरमा त्याचा रिमेक बनवू शकत नाही, अन्यथा काॅपीराईट कायद्याचा भंग होऊ शकतो, असे याचिकेत म्हटले आहे. 

न्या. गौतम पटेल यांच्यापुढे नुकतीच त्यावर सुनावणी झाली. पुढील सुनावणी होईपर्यंत सिनेमाचे काम सुरू करणार नाही, अशी हमी पॅनोरमाच्या वतीने खंडपीठाला देण्यात आली आहे. पॅनोरमाने स्वतःच्या जबाबदारीवर काम करावे, असा इशारा न्यायालयाने दिला आहे.Drishyam Sequel row in Mumbai High Court

याचिकेवर पुढील सुनावणी १८ जूनला होणार आहे.`दृष्यम` मर्डर मिस्ट्री आहे. अभिनेता मोहनलाल आणि अजय देवगण यांनी साकारलेले मल्याळम व हिंदी असे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्यामुळे हिंदी सिक्वेलची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

SCROLL FOR NEXT