ramesh pokhariyaal 2.jpg
ramesh pokhariyaal 2.jpg 
बातम्या

Breaking : डॉ. रमेश पोखरीयाल निशंक रुग्णालयात दाखल 

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक यांना पोस्ट कोविड Post Covid समस्यांमुळे आज एम्समध्ये AAIMS दाखल करण्यात आले आहे.  अशी माहिती एम्स रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.  रमेश पोखरियाल निशंक Dr. Ramesh Pokhriyal Nishank यांना एप्रिल 2021 मध्ये कोरोनाची लागण झाली होती. कोविड ची तपासणी केल्यानंतर माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे उपचार सुरू आहेत. अलिकडच्या काळात माझ्या संपर्कात आलेला कोणीही सावधगिरी बाळगा आणि स्वतःची चाचणी करून घ्या, असे ट्विट करत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचित केले होते. (Dr. Ramesh Pokhariyal admitted to Nishanka Hospital)  

आज, रमेश पोखरियाल यांच्या नेतृत्त्वात आज 12 बोर्ड परीक्षांबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार होता. मात्र आता त्यांच्या प्रकृतीमुळे आजची बैठकदेखील रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची CBSE आणि बारावी भारतीय माध्यमिक शिक्षणाचे प्रमाणपत्र  ICSEच्या इयत्ता 12 वी बोर्डाच्या परीक्षा  रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर Petition होणारी सुनावणी काल (31 मे)  तहकूब करण्यात आली.  यात पुढील सुनावणी 3 जून 2021 रोजी होणार आहे. याबाबत आज रमेश पोखरियाल निशंक  Dr. Ramesh Pokhriyal Nishank आणि सर्व  राज्याचे शिक्षणमंत्री आणि  उच्च सचिव यांच्यासमवेत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.  यात 12 बोर्डाच्या परीक्षांबबत चर्चा करण्यात येईल.. ज्यावर विचारविनिमय करून आज (1 जून) CBSE परिक्षांबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. मात्र आता ही बैठक देखील रद्द होणार झाल्याचे दिसत आहे. 

दरम्यान, देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्य़ात आलेला लॉकडाऊन आणि इतर नियमांत  शिथिलता आणण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या  20 दिवसांपासून देशात कोरोना बाधितांची संख्या बऱ्याच  प्रमाणात नियंत्रणात आली आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 86 हजार नवे कोरोनाबाधित आढळून आले आहे. तर एकाच दिवसांत 2, 59, 459 रुग्ण बरे झाले आहेत. तर  तब्बल 3660 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  यापूर्वी गेल्या  बुधवारी 2,11,298  नव्या रुग्णांची तर 3847 कोरोना रुग्णांचा मृत्यूची नोंद करण्यात आली होती. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: शरद पवार हे देशाचे शक्तीशाली नेते : संजय राऊत

Sonu Sood Whats Up Get Blocked : अभिनेता सोनू सूदचं व्हॉट्सॲप ब्लॉक; नेमकं कारण काय ?

Ishan Kishan Fined: पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का! इशान किशनवर BCCI कडून मोठी कारवाई

Success Tips: आयुष्यात यशस्वी व्हायचंय? या सवयी महत्वाच्या

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता.. शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT