doctor on stike
doctor on stike 
बातम्या

अकोल्यात कोविड रुग्णालयात काम करणारे दीडशे डॉक्टर संपावर

जयेश गावंडे

अकोला - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात कोविड Covid कक्षात रुग्ण Paitent सेवा देणाऱ्या 150 इंटर्न डॉक्टरांनी Doctor आपल्या विविध मागण्यांसाठी 5 मे आजपासून कामबंद पुकारले आहे. जोपर्यंत मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होत नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन Andolan मागे घेणार नाही अशी भूमिका इंटर्न डॉक्टरांनी Intern Doctor घेतल्याने रुग्णसेवा प्रभावित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. doctors working at Covid Hospital in Akola on strike

संपूर्ण राज्यात कोरोनाने Corna कहर केला आहे. अकोल्यातही कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील कोविड कक्षात कार्यरत असलेल्या इंटर्न डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. मागील वर्षी पेक्षाही यावर्षी आलेली कोविडची दुसरी लाट भयावह आहे. मेडिकल कॉलेजमध्ये 12 तास सेवा देणाऱ्या इंटर्न डॉक्टरांना केवळ 360 रुपये प्रतिदिन भत्ता दिला जात आहे.

हे देखील पहा -

आपला जीव धोक्यात घालून महामारीशी लढतांना रुग्ण सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर शासनाकडून मोठा अन्याय होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड कक्षात मोठ्या प्रमाणात रुग्ण दैनंदिन भरती होत आहेत. त्यात या रुग्णांची सेवा देणाऱ्या वैद्यकीय यंत्रणेतील डॉक्टरांना कुठल्याही सुविधा नसल्याने नाराजीचा सूर उटमत आहे. त्यामुळे या इंटर्न डॉक्टरांनी आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. एकाला एक न्याय व दुसऱ्याला  दुसरा ही भूमिका बदलवून आम्हालाही न्याय द्यावा अशी अपेक्षा इंटर्न डॉक्टरांनी केली आहे. doctors working at Covid Hospital in Akola on strike

या इंटर्न डॉक्टरांनी ३ मागण्या केल्या आहेत. त्यात पहिली मागणी म्हणजे मुंबई व पुण्याच्या आंतरवासिता डॉक्टरांना मागील वर्षी 50 हजार रुपये मानधन देण्यात आले. त्याचप्रमाणे अकोल्यातील डॉक्टरांना सुद्धा 50 हजार रुपये मानधन देण्यात यावे. दुसरी मागणी शासनाने सर्व आंतरवासिता डॉक्टरांना विमा कवच प्रदान करावे. तर तिसरी मागणी कोविड ड्यूटी दरम्यान आजारी पडल्यास उपचाराची सर्वस्वी जबाबदारी शासनाने घ्यावी.  मात्र या संपाचा फटका एकूणच आरोग्य सेवेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, या आधी  नागपुरातील इंटर्न डॉक्टर संपावर गेले होते. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय या दोन वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे साडेतीनशे एमबीबीएस इंटर्न MBBS intern डॉक्टरांनी संप पुकारला होता.  या इंटर्न डॉक्टरांनी कोरोना वॉर्डात काम करण्यास नकार दिला होता. गेल्यावर्षी कोरोना काळात ज्याप्रमाणे मुंबई आणि पुण्यातील डॉक्टरला कामांसाठी वेगळे मानधन देण्यात आले होते, तसेच मानधन त्यांनाही देण्यात यावे. अशी मागणी या डॉक्टरांनी यावेळी केली होती.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Fire : लाकडाची वखार, फर्निचर गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

Mayank Yadav: मयांक यादवचं नशीब फळफळणार!BCCI मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत

संभाजीराजे छत्रपती अभ्यासू, त्यांच्याकडून असं अपेक्षित नव्हतं : चंद्रकांत पाटील, Video

Prasadacha Sheera : मऊ लुसलुशीत आणि गोड प्रसादाचा शिरा रेसिपी

PM Narendra Modi Rally: शहजादेला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा, पीएम मोदींचा राहुल गांधींवर पुन्हा निशाणा

SCROLL FOR NEXT