double mask
double mask 
बातम्या

कोरोनाची दुसरी लाट सांगतेय आता एकाचवेळी दोन मास्क वापरा !

साम टीव्ही ब्युरो

मुंबई: पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट ही अधिक धोकादायक आहे. नव्या कोरोनाची आता लक्षणे बदललेली आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी आता डबल मास्क लावण्याचा सल्ला सामान्यांना दिला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतला कोरोना धोकादायक असल्यामुळे हा एका रुग्णापासून दहा जणांना कोरोनाची बाधा करू शकतो. त्यामुळे अधिक सुरक्षिततेसाठी डबल मास्क लावण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. Doctors advise applying double mask orally for greater safety

कोरोनाची पहिली लाट आणि कोरोनाची आत्ताची दुसरी लाट यात जमीन आसमानाचा फरक असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. कोरोनाविषाणूचे स्वरूप बदलल्याने दुसरी लाट रोखण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणे समोर उभे आहे. 

ही आहेत कोरोनाची नवीन लक्षणे :
डोळे लाल होणे, भूक न लागणे, थकवा जाणवणे, पोट दुखी, जुलाब, अंग दुखी ही कोरोनाची नवीन लक्षणे आहेत. 

नवीन कोरोना विषाणू नाकातून फुफ्फुसात जाण्यासाठी आता बारा ऐवजी पाच दिवस घेतो आहे. त्यामुळे तोंडावर एक ऐवजी दोन  मास्क लावण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. Doctors advise applying double mask orally for greater safety

'जेव्हा जमेल तेव्हा हात धुणे हॅन्ड ग्लोव्हज वापरणे, तसेच कारण नसताना बाहेर पडू नका'. असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणे कोरोनाचा संसर्ग होत आहे. लहान मुलांच्या कोरोना मृत्यूमुळे तज्ञांची चिंता वाढली आहे. कारण लहान मुलं नीट मास्क घालू शकत नाहीत. एकमेकांशी खेळण्यात आलेल्या संपर्कामुळे कोरोनाचा प्रसार जास्त होत आहे कि काय असे जाणवत आहे. शक्यतो लहान मुलांमधील लक्षणे ही सौम्य प्रकारची असतात. आणि ते लक्षण विरहित आजार पसरवणारे एसिम्प्टोमैटिक करियर आहे असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.  

सोशल डिस्टेंसिंग आणि सॅनिटायझरचा वापर केला तरच कोरोना रोखणे शक्य आहे. अन्यथा कोरोना रोखणे अशक्य आहे अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

Edited By- Sanika Gade
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT