nawale hospital
nawale hospital 
बातम्या

नावाळी रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून सुरु करा; 14 गावातील सर्व पक्षीय विकास समितीची मागणी

प्रदीप भणगे

कल्याण ग्रामीण : दहिसर - नावाळी गावात प्रशस्त असे शासकीय Government Hospital रुग्णालय आहे, परंतू गेले कित्येक वर्ष ते बंद असल्याने ग्रामस्थांना आरोग्य सुविधांपासून वंचित रहावे लागत असून कोरोना Corona काळात नागरिकांची गैरसोय होत आहे. लसीकरण Vaccination किंवा उपचारासाठी स्थानिक नागरिकांना निळजे आरोग्य केंद्रावर Health Center धाव घ्यावी लागत आहे. Demand to start Covid Hospital

कोरोना काळात नागरिकांना योग्य ती आरोग्य सुविधा मिळावी यासाठी नावाळी रुग्णालय हे कोविड रुग्णालय व लसीकरण केंद्र म्हणून सुरु करावे अशी मागणी 14 गाव सर्व पक्षीय विकास समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्याकडे केली आहे. 

हे देखील पहा -

जिल्हापरिषद सदस्य आणि शिवसेना Shiv Sena पदाधिकारी रमेश पाटील यांनी पुरावे दाखवत नवी मुंबई New Mumbai महानगरपालिकेमुळेच Muncipal Corporation हे हॉस्पिटल Hospital बंद पडले आहे असा दावा केला. तर 14 गावातील ग्रामस्थ आणि शिवसेना पदाधिकारी भरत भोईर यांनी भाजपवर निशाणा साधत नवी मुंबई महापालिकेच्या आडमूठी धोरणामुळेच हे हॉस्पिटल बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे इथेही शिवसेना-भाजप मध्ये संघर्ष सुरु होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तर दुसरीकडे नावाळी रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून सुरु करा अशी मागणी 14 गाव सर्व पक्षीय विकास समितीने पुन्हा एकदा केली आहे. Demand to start Covid Hospital

कोरोना संसर्गस्थिती आणि महामारीचा काळ पाहता  या हॉस्पिटलचे हस्तांतरण या ठिकाणी लसीकरण केंद्र व कोविड हॉस्पिटल त्वरित चालू केले पाहिजे अशी मागणी देखील करण्यात येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणि प्रशासन याकडे लक्ष देईल का हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Edited By - Krushna Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Diet: योगा केल्यानंतर प्या हे Healthy Drinks, आराम वाटेल

IPL 2024 Points Table: राजस्थाननंतर KKR ची प्लेऑफच्या दिशेने वाटचाल! दिल्लीचं टेन्शन वाढलं; पाहा गुणतालिका

Today's Marathi News Live : नसीम खान यांचं राज्यसभा किंवा विधानसभेत पुर्नवसन करु - मल्लिकार्जुन खरगे

Video: Vijay Shivtare यांनी अजित पवारांची घेतली भेट! कारण नेमकं काय?

Himayatnagar : हिमायतनगरमध्ये भीषण पाणीटंचाई, 19 कोटी रुपयांच्या योजनेचा नुसताच गाजावाजा; महिला उपाेषणाच्या तयारीत

SCROLL FOR NEXT