coronavirus
coronavirus 
बातम्या

दिलासादायक ! पुण्यात ‘कोरोना’ रुग्णांच्या संख्येत घट

अक्षय कस्पटे

कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. कोरोनाने Corona शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर थैमान घातल्याने, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. मात्र असे असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.  Decrease in the number of corona patients in Pune

गेल्या काही दिवसांपासून दररोज दीड ते दोन हजार पेशंट Paitent सापडणाऱ्या पुण्या आज नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी घाट झाली आहे. पुणे Pune शहरात आटोक्यात येत असलेल्या कोरोना ने पुन्हा डोकं वर काढलं आणि रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. मात्र आता या रुग्ण वाढीतून पुणेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. आज पुण्यात एकुण रुग्ण ६८४ रुगांची नोंद झाली आहे तर २७९० रुग्ण कोरोनमुक्त  झाले आहे. तर ४३ रुग्णांचा मृत्यू  झाला आहे.

हे देखील पहा -

गेल्या आठवड्यापर्यंत पुण्यात जावसपास 15 ते 17 हजार चाचण्या होत होत्या. मात्र गेल्या आठवड्यात जशी रुग्णसंख्या कमी व्हायला लागली तशी चाचण्यांची संख्या देखील कमी झाली. असे असले तरी देखील काल  11553 चाचण्या झालेल्या होत्या. इतक्या चाचाण्यांनंतर देखील रुग्ण संख्या हजारांचा आत येणं हा मोठा पुणेकरांसाठी दिलासा मानला जात आहे. Decrease in the number of corona patients in Pune

राज्यात आता रोजच्या करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा को कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या काही दिवसांपासून अधिक असल्याचे समोर येत आहे. असे असले तरी करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. पुण्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ४ लाख ५९ हजार ९८७ वर पोहचली आहे. तर आजपर्यंत  ७७४९   रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज  २७९० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर ४ लाख ३३ हजार ७९८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात  सध्या १८४४० रुग्णांवर उपचार उपचार सुरु  आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Champions Trophy: 'टीम इंडियाला पाकिस्तानात यावंच लागेल, अन्यथा...' माजी पाकिस्तानी खेळाडूची वॉर्निंग

Kalyan Crime News: तहान लागल्याने पाणी प्यायला गेली, नराधमानं संधी साधली; कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

India's Smallest Village: भारतातील सर्वात लहान गाव तुम्हाला माहिती आहे का?

Jayant Patil News : भाजपचे इंजिन बंद पडल्यामुळे मनसेचे इंजिन सोबत घेतले; जयंत पाटील यांची खोचक टीका

Today's Marathi News Live : उत्तर मुंबई पियुष गोयल यांची भव्य रॅली; महायुतीचे हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी

SCROLL FOR NEXT