Rajiv Satav
Rajiv Satav 
बातम्या

कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर : विश्वजीत कदमांची माहिती

साम टीव्ही ब्युरो

पुणे : कॉंग्रेसचे Congress नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव Rajiv Satav हे सध्या आयसीयूमध्ये असून ते व्हेंटिलेटवर आहेत, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम Viswajit Kadam यांनी दिली आहे. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. Congress MP rajiv satav condition stable informs Vishwajeet Kadam

राजीव सातव यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यासाठी विश्वजीत कदम आणि जहांगीर रुग्णालयाचे Jehangir Hospital डॉ. गील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सातव यांची प्रकृती स्थिर असून गरज पडल्यास मुंबईत Mumbai हलवण्याबाबत विचार करु असेही कदम यांनी सांगितलं आहे. कदम म्हणाले की, "१९ एप्रिलला राजीव सातव यांना कोरोनाची Corona लक्षणे दिसून आली.

२२ तारखेला त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह Positive आलुयाने २३ एप्रिलला ते पुण्यातील Pune जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र २५ तारखेला त्यांना आयसीयूमध्ये ICU दाखल करण्यात आलं होते. पण काही तक्रारींमुळे २८ तारखेला त्यांना व्हेंटिलेटरची गरज लागली. सातव यांची इच्छाशक्ती जबरदस्त आहे. जहांगीर हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांच्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. मला विश्वास आहे की ते यातून लवकर बाहेर येतील." Congress MP rajiv satav condition stable

राजीव सातव यांची प्रकृती काल दुपारपर्यंत व्यवस्थित होती. परंतु अचानक प्रकृती स्थिर नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल. ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. अशी माहिती डॉ. गील Dr. Gill यांनी दिली आहे. गरज पडल्यास मुंबईत हलवण्याबाबत विचार करु, असं विश्वजीत कदम यांनी सांगितलं आहे. कोरोनाग्रस्त राजीव सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी लीलावतीमधील डॉक्टरांची टीम पुण्याला जाणार आहे. 

दरम्यान, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आणि रुग्णालय प्रशासनावर ताण पडू नये, यासाठी कोणीही गर्दी करु नये, फोनवरुनच तब्येतीची विचारपूस करावी, अशी विनंती कुटुंबीयांनी केल्याचं विश्वजीत कदम यांनी सांगितले आहे. राजीव सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांचे विश्वासू आहेत. सातव हे हिंगोलीचे माजी खासदार आहेत. २०१४ मध्ये मोदी लाटेतही त्यांचा विजय झाला होता. काँग्रेस आणि गांधी घराण्याची निष्ठा असल्याने त्यांच्याकडे गुजरातच्या Gujarat काँग्रेस प्रभारीपदाची जबाबदारी आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

SCROLL FOR NEXT