covaccine.jpg 
बातम्या

6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांवर क्लिनिकल चाचण्यांना उद्यापासून  सुरवात 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली :  दिल्लीतील  एम्स रुग्णालयात Delhi AIIMS Hospital  मुलांवर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन Covacin लसीची चाचणी सुरू आहे. आतापर्यंत, 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची क्लिनिकल ​​चाचणी clinical trial सुरू झाली आहे, तर 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांच्या चाचणीसाठी भरती आणि तपासणी 15 जूनपासून सुरू होणार आहे. (Clinical trials on children between the ages of 6 and 12 begin tomorrow) 

त्याचबरोबर कर्नाटकातील एम्स पटना, मैसूर मेडिकल कॉलेज आणि कर्नाटकातील रीसर्च संस्थान यांची क्लिनिकल चाचण्यांसाठी निवड करण्यात आली आहे.  6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांवर होणाऱ्या वैद्यकीय चाचण्यांसाठी 525 केंद्रांची निवड करण्यात आली आहे. या वयोगटातील चाचण्या झाल्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालय AIIMS Hospital, Delhi 2 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांवर क्लिनिकल चाचण्या सुरू होतील. (Clinical trials on children between the ages of 6 and 12 begin tomorrow) 

विशेष म्हणजे मुलांना लसीचा एक डोस आधीच देण्यात आला आहे.  दरम्यान,  यापुर्वीच दिल्लीतील एम्स रुग्णालयात मुलांवर भारत बायोटेकच्या लसीची चाचणी सुरू आहे. या चाचणीसाठी 12 ते 18 वर्षे, 6 ते 12 वर्षे आणि 2 ते 6 याप्रमाणे मुलांचे वयानुसार तीन गटात विभाजन करण्यात आले आहेत.  आतापर्यंत, 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या वैद्यकीय ​​चाचण्या सुरू झाल्या आहेत, तर 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांच्या क्लिनिकल चाचण्या 15 जूनपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर दिल्ली एम्सने या चाचणीत सामील होण्यासाठी व्हाट्सएप आणि ईमेल आयडीही  जारी केला आहे.

एम्सचे कम्युनिटी मेडिसिनचे डॉ. संजय राय यांनी याबाबत माहिती दिली आहे. वेगवेगळ्या वयोगतील मुलांवर क्लिनिकल चाचण्या करण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांत भरती केली जात आहे. 12 ते 18 वर्षे भरती संपली आहे,  आता उद्यापासून 6 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांवर क्लिनिकल चाचण्या सुरू होणार आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात  2 ते 6 वर्षांच्या मुलांच्या क्लिनिकल चाचण्याही लवकरच केल्या जाणार आहेत.  एम्स दिल्लीने क्लिनिकल चाचण्यांमध्ये मुलांना समाविष्ट करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नंबर आणि ईमेल आयडी जारी केला आहे. जो कोणी आपल्या मुलांना या क्लिनिकल चाचणीमध्ये सामील करू इच्छित असेल तो स्वत: आणि त्यांच्या मुलांची माहिती 7428847499 या क्रमांकावर आणि ctaiims.covid19@gmail.com वर पाठवू शकतो.

एम्समध्ये सुरू असलेल्या चाचणीमध्ये इंडिया बायोटेकची लस 2 ते 18 वर्षे वयोगटातील 50 मुलांवर चाचणी केली जाणार आहे. मे महिन्यात, देशातील ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी व भारत बायोटेकच्या कोरोना लसीची शिफारस स्वीकारल्यानंतर या लसीच्या दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना परवानगी दिली आहे. क्लिनिकल चाचण्यांमध्ये, लस इंट्रामस्क्युलर मार्गाद्वारे दोन डोसमध्ये दिली जाईल.

  • क्लिनिकल चाचण्यांमध्ये सामील होण्यासाठी काही अटीही लागू करण्यात आल्या आहेत. 

- ज्या मुलांना कधीही कोरोना इन्फेक्शन झालेले नाही, अशाच मुलांना या चाचणीत       सामिल केले जाईल.

- ज्या मुलांच्या घरात सध्या कोणीतरी संक्रमित असेल तर अशा मुलांना देखील समाविष्ट केले जाणार नाही

- चाचणीत सामील होण्यापूर्वी, शरीरात अॅंटीबॉडी आहे की नाही याची तपासणी केली जाईल.

-प्रौढांवर  ज्या प्रकारे चाचण्या करण्यात आल्या त्याचप्रमाणे मुलांवरही करण्यात येतील  

- पहिल्या डोस आणि दुसर्‍या डोस दरम्यान 28 दिवसांचे अंतर असेल.

- मुलांना 6mg डोस देखील दिला जाईल.

- चाचणीत लस घेतल्यानंतर त्यांचे सतत परीक्षण केले जाईल.

Edited By - Anuradha Dhawade 
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

Kalyan : कल्याणमधील नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर; शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प, कारण काय?

SCROLL FOR NEXT