बातम्या

‘या’ मतदारसंघात चक्क भाजपला मनसेचा पाठिंबा

सकाळ न्यूज नेटवर्क

चांदवड : चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या विजयासाठी वाटेल ते करू, हा निर्धार महायुतीतील कुठल्या पक्षाचा नव्हे तर महायुती विरोधात लढत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे. हे ऐकून मतदारसंघातही आश्‍चर्य व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चांदवड तालुका अध्यक्ष संपत वक्ते यांनी भाजपचे डॉ. आहेर यांना जाहीर कार्यक्रम घेऊन पाठींबा जाहीर केला आहे.

 एव्हढेच नव्हे तर ते वडाळीभोई येथे झालेल्या प्रचारसभेत सहभागी झाले. यावेळी ते म्हणाले, ''या निवडणुकीत डॉ. आहेर यांना चांदवड तालुका 'मनसे' पाठिंबा देत आहे. '' उद्योजक शशिकांत जाधव, बाजार समितीचे सभापती डॉ आत्माराम कुंभार्डे, भूषण कासलीवाल, नितीन आहेर, कारभारी आहेर, विलास ढोमसे, बाळासाहेब वाघ, बाळासाहेब माळी, बबन पुरकर, शांताराम भवर आदी प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.

डॉ. आहेर यांना 'मनसे' व्यक्ती म्हणून पाठिंबा देत आहे, असे वक्ते यांनी सांगितले. पाच वर्षांत तालुक्‍यात सुरू असलेला विकासाचा झंझावात पाहता त्यांना या निवडणुकीत विजयापर्यंत पोचविण्यासाठीच मनसेचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले. उपाध्यक्ष गोविंद गांगुर्डे, तालुका संघटक दिगंबर गांगुर्डे, तालुका उपाध्यक्ष सोमनाथ सोनवणे, तालुका चिटणीस तन्वीर शेख, प्रमोद गांगुर्डे, संजय गुंजाळ, ज्ञानेश्‍वर शिंदे, नितीन उशीर, शिवाजी अहिरे, दत्तात्रेय जाधव, विनोद शेळके, विकास गुंजाळ, नागेश ठोंबरे, विशाल ठाकरे, अनिल धनाईत, नाना चौधरी, खंडेराव घुले आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड कराचांदवड मतदारसंघात 'मनसे'चा भाजपच्या चांदवड : चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांच्या विजयासाठी वाटेल ते करू, हा निर्धार महायुतीतील कुठल्या पक्षाचा नव्हे तर महायुती विरोधात लढत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे. हे ऐकून मतदारसंघातही आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 
डॉ. राहुल आहेरांना पाठिंबा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT